ना. थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

देशासाठी आदर्शवत ठरलेल्या संगमनेरच्या (Sangamner) सहकार पंढरीतील विविध सहकारी शिखर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meetings of Co-operative Summits) राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) व आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन (Online) पद्धतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या (Maharshi Bhausaheb Thorat Co-operative Sugar Factory) कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.

करोना संकटाच्या (Corona Crisis) पार्श्वभूमीवर यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) या ऑनलाईन (Online)पद्धतीने होणार असून सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांना या बाबदचे अहवाल पाठवण्यात आले आहे. तसेच या सभांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना ऑनलाईन सुविधा (Online facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Sahakari Sugar Factories) कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात ऑनलाईन पद्धतीने या वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर सकाळी 11:30 वाजता संगमनेर शेतकी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 12.30 वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन अमित पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यानंतर दुपारच्या सत्रात दुपारी 3 वा. संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर सायं. 4.30 वा. गरुड कुकूटपालन या व्यवसायिक संस्थेची वार्षिक सभा राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली आणि सायं. 5 वा. हरिचंद्र सहकारी पाणीपुरवठा फेडरेशन संस्थेची वार्षिक सभा राजेंद्र गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सभासदांना ऑनलाइन प्रणालीने यामध्ये सहभाग घेता येणार आहे. या विविध सभांसाठी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, शंकरराव पा. खेमनर, सभापती सुनंदाताई जोर्वेकर यांसह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, अमृतवाहिनी बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, यांचे सह सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. प्रतापराव उबाळे, अनिल थोरात, रमेश थोरात, बाळासाहेब उंबरकर, मंगेश सांगळे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *