इंजिनिअरिंगच्या ऑप्शन फॉर्मसाठी तारखा जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका (First Year Diploma in Engineering and Technology) प्रवेश प्रकिया २०२१-२२ राबविण्यात येत आहे….

प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ७ सप्टेंबरला संपल्याने पुढील कार्यक्रम संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी ९ सप्टेंबर व अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबर रोजी जाहीर होईल.

अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत काळजीपूर्वक सर्व बाबींचा तपास करून ऑप्शन फॉर्म (Option form) भरावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ (dr. Abhay Wagh) व शासकीय तंत्रनिकेतन नाशिकचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे (Dnyandev Nathe) यांनी केले आहे.

ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

कॅप राऊंड १

  • दि.१३ सप्टेंबरला पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे.

  • दि. १३ ते १६ सप्टेंबरला उमेदवाराच्या लॉगइन मधुन कॅप राऊंड १ साठी ऑप्शन फॉर्म भरणे.

  • दि. १८ सप्टेंबरला पहिल्या फेरीसाठी जागा वाटप प्रदर्शित करणे.

  • दि. १९ ते २२ सप्टेंबरला पहिल्या फेरीसाठी वाटप झालेल्या जागेची उमेदवाराने त्याच्या लॉगइन द्वारे स्वीकृती करणे.

  • दि. १९ ते २३ सप्टेंबरला पहिल्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे.

कॅप राऊंड २

  • दि.२४ सप्टेंबरला दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे.

  • दि. २५ ते २८ सप्टेंबरला कॅप राऊंड २ साठी ऑप्शन फॉर्म उमेदवाराच्या लॉगइन मधुन भरणे.

  • दि. ३० सप्टेंबरला दुसऱ्या फेरीसाठी जागा वाटप प्रदर्शित करणे.

  • दि. ०१ ते ०५ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी वाटप झालेल्या जागेची स्वीकृती उमेदवाराने त्याच्या लॉगइनद्वारे स्वीकृती करणे.

  • दि. ०१ ते ०६ ऑक्टोंबरपर्यंत दुसऱ्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करणे.

  • दि.०१ ऑक्टोबरपासून शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *