Friday, April 26, 2024
Homeनगरसत्ताधारी भाजपाला माझ्या मदतीची गरज का भासली

सत्ताधारी भाजपाला माझ्या मदतीची गरज का भासली

सुपा |वार्ताहर| Supa

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण भाजपाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले आहे.

- Advertisement -

त्यावर अण्णांनी सत्ताधारी भाजपाला माझ्या मदतीचे गरज का भासली? असा सवाल करत खरमरीत उत्तर दिले आहे.

दिल्लीत येऊन ‘आप’ पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठविला पाहिजे आणि आम्हाला सहकार्य करावे, असे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी 24 ऑगस्टला अण्णा हजारे यांना पत्र लिहिले होते.

त्याला उत्तर देताना अण्णांनी म्हटले की, तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमची भारतीय जनता पार्टी मागील सहा वर्षांहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती आहे.

तुमच्या पार्टीमध्ये तरुणांची संख्या मोठी असून जगातील सर्वाधिक पार्टी सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात 10 बाय 12 फूट खोलीत राहणार्‍या 83 वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते.

आज केंद्रात आपल्या पार्टीचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, आर्थिक अपराध, व्हिजनस, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत.

पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि जर दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? असेही स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या