Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअखेर अंजनेरी पर्वतावर जाणारा प्रस्तावित रस्ता रद्द!

अखेर अंजनेरी पर्वतावर जाणारा प्रस्तावित रस्ता रद्द!

नाशिक | Nashik

अंजनेरी राखीव वनातील मौजे मुळेगावापासून थेट अंजनेरी गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव अखेर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अखेर रद्द केला आहे.

- Advertisement -

यामुळे नाशिकसह राज्यातील पर्यावरण व निसर्गप्रेमींच्या लढ्याला यश आले असून केवळ पर्यावरणास अनुकूल, शाश्वत आणि निसर्गाशी सुसंगत अशा विकासकामांनाच महाराष्ट्रात चालना दिली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंजनेरी हे श्री हनुमानाचे जन्मस्थान आहे. येथील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, तसेच या ठिकाणाची पवित्रता अबाधित रहावी हाच मानस असून येथे खूप आधीपासून विचाराधीन असलेला, ज्याचा प्रस्ताव याआधी ३ वेळा आला आहे, तो रस्ता होणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गाेडसे यांच्यासोबत बोलून अंजनेरी येथील पर्यावरणाच्या संवेदनशीलतेवर चर्चा केली आहे. याठिकाणी “सेरोपेजिया अँजेनेरिका” ही वनस्पती अंजनेरी सोडून इतर कोठेही आढळत नाही. या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान, या स्थानास कोणतीही हानी न पोहोचवता येथील पवित्रतेशी सुसंगत अशा रीतीने यात्रेकरू आणि ट्रेकर्सना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर योजना बनविण्याचा मानस असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने २०१७ साली अध्यादेश जारी करून नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या पश्चिम भागातील नाशिक वन परिक्षेत्रातील अंजनेरी गडावरील एकूण ५६९.३६० हेक्टर (५ हजार ६९३ चौ.किमी) क्षेत्र ‘राखीव संवर्धन’ म्हणून घोषित केले. या राखीव वनाची जपवणूक होणे गरजेचे असून त्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या