Thursday, April 25, 2024
Homeनगरअंजनापूर बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - ना. काळे

अंजनापूर बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील अंजनापूर येथील बंधारा गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला असून त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार करा, अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होवून क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे हा बंधारा अखेर फुटला. त्यामुळे बंधार्‍याच्या लगत असणार्‍या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सदर बंधारा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी तातडीने तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल तयार करून शासन दरबारी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना प्रशासनाला सदरचा बंधारा दुरुस्तीसाठी यंत्रणा पाठविण्याच्या सूचना दिल्या असून बंधारा दुरुस्तीसाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने बंधारा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

यावेळी काळे कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, विजय कोटकर, नाना गव्हाणे, दत्तू गव्हाणे, शिवाजी गव्हाणे, रावसाहेब गव्हाणे, भास्कर गव्हाणे, प्रकाश गव्हाणे, दत्तू गव्हाणे, विजय गव्हाणे, विवेक गव्हाणे, आप्पासाहेब पाडेकर, अनिल पाडेकर, आर. आर. रोहमारे, पंचायत समिती अभियंता जी. डी. लाटे, पाटबंधारे विभागाचे ए. पी. वाघ, आर. आर. रोहम, शाखा अभियंता एन. जी. गायकवाड उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या