Thursday, April 25, 2024
HomeजळगावVideo अंजली पाटील जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्य

Video अंजली पाटील जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्य

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत रोवला विजयाचा झेंडा

- Advertisement -

जळगाव – तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत (तृतीयपंथी) अंजली पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

या विजयामुळे त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (अंजली जान गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले असुन बादली वृध्द ग्रामपंचायतीत विजयाचा झेंडा रोवला आहे. तृतीयपंथी अंलजी पाटील यांच्या विजयाने जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या