Wednesday, April 24, 2024
Homeनगरभेर्डापूरच्या सरपंचपदी अनिता कांदळकर

भेर्डापूरच्या सरपंचपदी अनिता कांदळकर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या भेर्डापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिक-ससाणे गटाच्या

- Advertisement -

अनिता चंद्रकांत कांदळकर यांची तर उपसरपंचपदी प्रताप सोपानराव कवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भेर्डापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे शाखा अभियंता एन.बी.ठोले यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी राजू आण्णासाहेब भालदंड, सहाय्यक लिपीक सुरेश कांदळकर व दत्तात्रय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली.

सरपंच पदासाठी गावकरी विकास मंडळाच्या अनिता चंद्रकांत कांदळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी गावकरी विकास मंडळाचेच प्रताप सोपानराव कवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेच्या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब रघुनाथ कवडे, गणपत सखाराम राऊत, पुष्पा अरुण कवडे, प्रा.डॉ.बाबासाहेब नानासाहेब पवार सर, अनिल किसन दांगट, सोनाली दिलीप कसबे व वैशाली बाबासाहेब बर्डे उपस्थित होते. तर महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्या सुवर्णा विजय काळे व सरस्वती बाळासाहेब राऊत अनुपस्थित होत्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजू वायकर उपस्थित होते. यावेळी भेर्डापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या