Thursday, April 25, 2024
Homeनगरघोडेगावात काही व्यापारी धुडकावताहेत ‘जनावरे बाजार बंद’चा आदेश

घोडेगावात काही व्यापारी धुडकावताहेत ‘जनावरे बाजार बंद’चा आदेश

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार सध्या लंंपी आजारामुळे बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील बाजार समितीच्या बाहेरील बाजूस घोडेगाव-झापवाडी रस्त्याच्या बाजूला काही व्यापारी हा बाजार सर्व आदेश झुगारून भरवत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

येथील जनावरांचा बाजाराची ख्याती सर्वदूर असल्याने या ठिकाणी परराज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्री साठी येत असतात. खबरदारी म्हणून या ठिकाणी भरवला जाणारा जनावरांचा आठवडे बाजार लंपीचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या ठिकाणी स्थानिक व्यापारी चोरी छुप्या मार्गाने शासनाच्या सर्व नियमाचे उल्लंघन करत बाजार समितीलगत मोकळ्या जागेवर हा बाजार भरवतात.

काही दक्ष नागरिकांनी याची कल्पना सोनई पोलिसांना दिली असता संबंधित व्यापार्‍यावर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता फक्त समज देवून सोडून दिले. असेच जर सुरू राहीले तर परिसरातील कित्येक जनावरांना या आजाराची लागण होण्यास वेळ लागणार नाही. मग मात्र या आजारात सोनई पोलीस देखील तितकेच जबाबदार असणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या