Saturday, May 11, 2024
Homeदेश विदेशअनिल अंबानींनी 'या' दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले... काय आहे कारण?

अनिल अंबानींनी ‘या’ दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले… काय आहे कारण?

अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (R-Infra) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

यापूर्वी, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) अनिल अंबानी यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये सामील होण्यास मनाई केली होती. तेव्हापासून अनिल अंबानींना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं म्हटलं जात होतं.

- Advertisement -

रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेबीच्या अंतरिम आदेशानंतर गैर-कार्यकारी संचालक अनिल अंबानी कंपनीच्या संचालक पदावरून पायउतार झाले आहेत.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, अनिल अंबानी यांनी सेबीच्या अंतरिम आदेशाचे पालन करून कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.

सेबीने (SEBI) फेब्रुवारीमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींवर कथितपणे पैशांची लाँड्रिंग केल्याबद्दल सिक्युरिटीज मार्केटमध्ये बंदी घातली होती.

आर-पॉवर आणि आर-इन्फ्राच्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वतंत्र संचालक म्हणून अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली, असे दोन्ही ADAG समूह कंपन्यांनी सांगितले. मात्र, ही नियुक्ती सध्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

सध्या अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत. यामध्ये रिलायन्स इन्फ्राटेल, रिलायन्स टेलिकॉम, रिलायन्स नेव्हल आणि रिलायन्स कॅपिटल यांचा समावेश आहे. याशिवाय पिरामल ग्रुपची कंपनी पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स (PCHFL) ने देखील रिलायन्स पॉवर विरोधात NCLT कडे संपर्क साधला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या