Saturday, April 27, 2024
Homeधुळेसंतप्त शेतकर्‍यांनी बाजारसमितीत लिलाव पाडला बंद

संतप्त शेतकर्‍यांनी बाजारसमितीत लिलाव पाडला बंद

धुळे । Dhule। प्रतिनिधी

गव्हाच्या (wheat) लिलावाची बोली (Auction bid) व्यापार्‍यांकडून (traders) कमी लावण्यात आल्याने संतप्त गहु उत्पादक शेतकर्‍यांनी (farmers) आज लिलाव बंद (auction closed) पाडला. भाजपाचे तालुकाध्यक्ष (BJP taluka president) देवेंद्र पाटील (Devendra Patil) यांच्या मध्यस्थी नंतर लिलावाला पुन्हा सुरुवात झाली. रब्बीचा हंगाम संपला असून शेतकर्‍यांच्या घरात गहु आला आहे.

- Advertisement -

काल बाजार समितीत गव्हाला (wheat) 2400 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे चांगला भाव मिळाला. त्यामुळे आनंदीत गहू उत्पादक शेतकर्‍यांनी (farmers) आज मोठ्या प्रमाणात गहु धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने विक्रीसाठी आणला. मात्र गव्हाची आवक जास्त झाल्याने तसेच शेजारील अमळनेर येथील बाजार समिती बंद असल्याने व्यापार्‍यांनी (traders) गव्हाला 1800 रुपयांपासून बोली लावली.

त्यामुळे शेतकरी, संतप्त झाले.त्यांनी लिलाव बंद (auction closed) पाडला. या घटनेची माहिती कळताच, त्यांनी मार्केट कमीटीच्या सचिवांसह व्यापारी आणि शेतकर्‍यांशी चर्चा करत तसेच इतर बाजार समितीमधील गव्हाचे भाव जाणून घेत 2 हजार रुपयांच्या पुढे, गव्हाच्या लिलावाची बोली लावावी असे सर्वांनुमते ठरविले. त्यानंतर पुन्हा लिलावाला सुरुवात झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या