Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधरागाची शांतता आणि रत्ने

रागाची शांतता आणि रत्ने

काही जणांचा राग हा अगदी नाकावर असतो त्यांना काहीही बोलले तरी त्यांचे त्यांच्या रागावर नियंत्रण नसते. अशांना राग आल्यानंतर त्यांच्या आजुबाजूलाही उभे राहावेसे वाटत नाही. खूप जणांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच उपाय करावे लागतात. पण काहीही उपाय करुन तुमचे मन शांत होत नसेल तर तुम्ही राग शांत करण्यासाठी काही रत्नाचा वापर नक्कीच करु शकता. अशा रत्नांमधील वेगवेगळ्या घटकांमुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि तुमचा रागही बर्‍यापैकी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

मोती – Pearls दुधाळ अशा रंगाचा मोती हा खूप जणांना धारण करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: ज्यांना खूप राग येतो. त्यांच्यासाठी हे रत्न तर फारच फायद्याचे असते.मोती हे दिसायला थंड आणि शांत असतात. त्याच्या वापरण्यानंतर रागाला शांत करण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पत्रिकेत मोती घालण्याचा सल्ला दिला असेल तर त्यामागे हे एक कारण देखील नक्कीच असू शकते. त्यामुळे मोती घालण्याच्या आधी तुम्ही नक्की योग्य सल्लागाराला विचारा. शक्यतो मोती हा कोणीही घालू शकतो.

- Advertisement -

सुनेहला – पिवळ्या रंगाचे हे रत्न तुम्हाला पाहिल्यानंतर पुखराजची आठवण येत असेल. पण हे रत्न सुनेहला या नावाने ओळखले जाते. हे रत्न पुखराज या ग्रहाचे उपरत्न आहे. मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी हे रत्न फारच फायदेशीर आहे. अनेकदा रागाचे किंवा चीडचीड येण्याचे कारण हे मानसिक ताण असते. असा मानसिक ताण कमी करण्याचे काम सुनेहला करते. राग शांत करण्यासाठी हे रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही हे रत्नधारण केले तर नक्कीच तुम्हाला त्यामुळे तुमच्या वागण्यात झालेला फरक जाणवेल.

रत्न धारण करताना – रत्न धारण करताना काही गोष्टींची काळजी देखील घेणे गरजेचे असते. असे म्हणतात की, हे रत्न जर तुम्ही तांबे किंवा चांदीमध्ये धारण करणे गरजेचे असते. अशापद्धतीने जर तुम्ही रत्न धारण केले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. पण हे रत्न नेमके कशात जडवायची याची योग्य माहितीही तुम्हाला असायला हवी. त्यामुळे तुम्ही रत्न धारण करताना या गोष्टींचा विचार करायला हवा.

कोणतेही रत्न खरेदी करताना ते तुटलेले किंवा मोडलेले नसावे. रत्न नीट पाहून मगच घ्यावे. त्यामुळे त्याचे पूर्ण फायदे मिळतात. रत्न निवडण्यासोबतच तुम्हाला रत्न कोणत्या हातात घालायचे हे देखील माहीत हवे. योग्य वोटाची निवड केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. रत्न कधी आणि कोणत्या काळासाठी घालायचे आणि हे रत्न कशापद्धतीने घालायचे याची योग्य माहिती करुन घ्या. तरच त्याचा फायदा तुम्हाल होऊ शकेल. आता राग शांत करण्यासाठी तुम्ही या खड्यांचा वापर नक्की करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या