Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअंगणवाडी, आशासेविकांचा पगार वाढवणार : ठाकूर

अंगणवाडी, आशासेविकांचा पगार वाढवणार : ठाकूर

संगमनेर । प्रतिनिधी | Sinnar

राज्यातील सर्व महिला भगिनींच्या पाठीशी ज्योतीबाप्रमाणे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) उभे असून अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व आशा सेविका (Asha worker) यांना पेन्शन योजना (Pension plan),

- Advertisement -

एलआयसी योजनेसह (LIC plan) पगार वाढ (Salary increase) करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Development Minister Yashomati Thakur) यांनी केली.

वसंत लॉन्स येथे एकवीरा फाउंडेशनच्या (Ekvira Foundation) वतीने कोरोनाच्या (corona) महासंकटात सेवाभावीपणे काम केलेल्या आरोग्य सेविका (Health worker), अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आशा सेविका (Asha worker), बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा पार पडला. त्यात त्या बोलत होत्या. ना. ठाकूर यांनी ऑनलाईन पध्दतीने भाग घेतला. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) होते.

व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख, डॉ.जयश्री थोरात उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारने स्त्री-पुरुष समानतेसाठी सर्वसमावेशक असे नवीन महिला धोरण राबविले आहे. महिलांना आरक्षणापेक्षा आदर मिळाला पाहिजे. यासाठी सर्वत्र काम होणे गरजेचे आहे.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनी कोरोना संकटांमध्ये केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. राज्यभरातील या सर्व भगिनींना आगामी काळात ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली एलआयसी योजना, पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी धोरण ठरविण्यात आले आहे. सर्व महिला भगिनींना लवकरच पगारवाढ केली जाणार आहे. तसेच बाल संगोपनासाठी 2500 रुपये दिले जात असून ते 5000 होण्याकरता सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही ना. ठाकूर म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या