Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रआंदोलनजीवी शब्दप्रयोग हा देश निर्मितीप्रक्रियेसाठीच अवमानकारक - गणेश देवी

आंदोलनजीवी शब्दप्रयोग हा देश निर्मितीप्रक्रियेसाठीच अवमानकारक – गणेश देवी

पुणे (प्रतिनिधी) –

आपल्या देशाचा जन्मच आंदोलनातून झाला. स्वातंत्र्यलढय़ात ‘चले जाव,’ ‘भारत छोडो,’चा नारा देण्यात आला. याला जोडूनच आंदोलन

- Advertisement -

हा शब्द येतो. भारताची निर्मितीप्रक्रियाच आंदोलनापासून सुरू झाली. हे पाहता तेव्हाचा प्रत्येक नागरिक आंदोलनजीवी ठरतो. असे असताना संसदेतून पंतप्रधान उपहासाने असा शब्दप्रयोग करतात, हे देश निर्मितीप्रक्रियेसाठीच अवमानकारक आहे अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात 105 जणांनी बलिदान दिले. किंबहुना, हे लक्षान घेता केवळ रेवडी उडविण्यासाठी मोदींनी ही शब्दयोजना केली आहे. 2008-9 मध्ये माध्यमांबद्दलही त्याने असेच विधान केले होते. आंदोलनजीवी ही एक शिवीच असून, ट्रम्प यांचीही भाषा अमेरिकेतील आंदोलनाबद्दल इतकी खालावली नव्हती.

कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत त्यांना सलामच ठोकला पाहिजे. कोणतेही कायदे हे साधकबाधक चर्चा करून व्हायला हवे होते. यात शेतकऱयांच्या अंगाने विचार झालेला दिसत नाही. म्हणूनच सरकारला हे कायदे शेतकरीहिताचे वाटत असले, तरी शेतकऱयांना ते नको आहेत, याकडे लक्ष वेधत अनेक राजकीय पक्ष आता खुली बाजार व्यवस्था स्वीकारतात. त्यामुळे मोठा विरोध झाला नसावा. तर काही पक्षांनी याला मानवतावादाचा चेहरा असावा, असे म्हटले आहे. तथापि, शेतकऱयांची अर्थव्यवस्था कोसळली, तर सर्व काही कोसळेल, असा इशाराही त्यांनी ािrदला.

पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून दहा लाख सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. येत्या 25 तारखेला या सह्या गोळा केल्या जातील. राष्ट्र सेवा दलाचे सभासद आणि समविचारी संघटना या मोहिमेसाठी गावोगावी फिरणार आहेत. ते तिथल्या तहसीलदारांना सहय़ांचे निवेदन देणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांमार्फत त्या राष्ट्रपतींकडे पोहोचविल्या जातील. शेतकरी आंदोलनाची परिस्थिती कडेलोटाला आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे आंदोलन पोहोचले आहे. महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळाला, तर आंदोलक शेतकऱयांचे बळ वाढणार आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न मिटवावा, असे आवाहन डॉ. देवी यांनी केले.

काही वर्षांपूर्वी सरकारने देशाचा बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी एक समिती नेमली होती. पण त्यात केवळ उत्तर महाराष्ट्रातील मंडळींचा समावेश करण्यात आला आहे. द्रविडी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारे यात कुणीही नाही. सरकारची आर्यन संस्कृतीविषयीची आस्था पाहता यातून इतिहासाचे विडंबन होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.इतिहासाचे विडंबन रोखण्यासाठीच अडीच ते तीन हजार पानांचा समांतर इतिहासग्रंथ लिहिणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुढील वर्षी 26 जानेवारी 2022 मध्ये करणार आहे. यामध्ये मानवी वस्ती, शेती, स्थलांतरे, भाषांचा उगम, शस्त्र -अवजारे यांचा विकास, शहरांची रचना, वेगवेगळे विचार, धर्म, संप्रदाय, 17 व्या शतकात भारत श्रीमंत देश असताना युरोपीय देशांचा पराभव का करू शकलो नाही, या कारणमीमांसेसह विविध पैलूंचा यात समावेश असणार आहे, असे डॉ. देवी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या