Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : समृद्धीच्या कामासाठी पुरातन बंधाऱ्याला सुरुंग

सिन्नर : समृद्धीच्या कामासाठी पुरातन बंधाऱ्याला सुरुंग

वावी | Wavi

मुरूम माती काढण्यासाठी पुरातन बंधारा फोडल्याचा प्रकार नुकताच मलढोण येथे घडला आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने हा प्रकार केल्याचे उपस्थितांचे म्हणने आहे. १९७४ साली आमदार सूर्यभान गडाख यांच्या कारकिर्दीत तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी पाझरतलाव तसेच बंधारे बांधण्यात आले होते. मलढोण येथे ही अशाच पद्धतीने बंधारा बांधण्यात आला होता. या परिसरातील पिण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून गडाख यांनी जवळपास ३० ते ४० एकर मध्ये हा बंधारा मलढोण गावानजीक बांधला होता.

सध्या सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस चांगल्या प्रमाणात असल्याने परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. मात्र परिसरातील शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा विचार न करता संबंधित ठेकेदाराने या बंधाऱ्या जवळ समृद्धी महामार्गासाठी माती काढण्याचे मोठ्या झपाट्याने सुरु आहे.

(दि.१२) झालेल्या जोरदार पावसाने या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढल्याने संबंधित ठेकेदाराला मुरूम माती काढणे शक्य होत नव्हते. या ठेकेदाराने मनमानी करत जुना बंधारा फोकलॅडच्या साह्याने फोडून पाणी काढून दिल्याचा प्रकार घडला आहे.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी बंधारा फोडल्याचा जाब विचारला असता केवळ उडवाउडवी चे उत्तरे देऊन या ठेकेदाराने पोबारा केला आहे. तरी संबंधित ठेकेदारावर पाठबंधारे विभागाने तात्काळ कारवाही करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या