Thursday, April 25, 2024
Homeनगरअंचलगाव येथे सामाजिक वनीकरणाने लावलेल्या वृक्षांना आग

अंचलगाव येथे सामाजिक वनीकरणाने लावलेल्या वृक्षांना आग

जेऊर कुंभारी |वार्ताहर| jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव येथील सामाजिक वन विभागाकडून 36 एकर जागेमधील विविध प्रकारची झाडांची लागवड करण्यात आली आहे. अंचलगावने जिल्ह्यात झाडांचे संगोपन करण्यात एक आदर्श निर्माण केला आहे. वृक्षारोपण करण्यात अंचलगावाने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास सामाजिक वन विभागातील छत्तीस एकर वनास अचानक आग लागली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्याने जंगल बेचिराख होण्यापासून वाचले.

- Advertisement -

सोमवारी रात्री आंचलगावच्या जंगलात आगीचे लोळ दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुभाष सखाराम शिंदे, वाल्मिक फकिरराव शिंदे,निलेश औटी, अरूण शिंदे, भाऊसाहेब खिरडकर, दिलीप शिंदे, रमेश शिंदे, तुकाराम मोहिम, अप्पासाहेब शिंदे,जालिंदर शिंदे, नवनाथ शिंदे, दशरथ शिंदे, सोन्याबापु शिंदे, अमोल खिरडकर, रंगनाथ शिंदे, शरद शिंदे, गणपत शिंदे, महेश शिंदे व इतर ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बागुल भाऊसाहेब व शिपाई विकास शिंदे तसेच सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे फायर फायटरवरील फायरमन शेख व गायकवाड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करून रात्री 10.45 वाजता आग विझवण्यात यश मिळविले. लाखो झाडांना जिवदान मिळाले. मदत केलेल्या सर्व ग्रामस्थ, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे अंचलगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या