Wednesday, April 24, 2024
Homeधुळेआनंदखेड्यात जुगार अड्डयावर छापा

आनंदखेड्यात जुगार अड्डयावर छापा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील आनंदखेडे शिवारात एका बंद खांडसरीच्या बाजुला सुरू असलेल्या जुगार अड्डयावर काल सायंकाळी छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

त्यांच्याकडून रोख रक्कमेसह चार दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 59 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्ह दाखल झाला आहे.

आनंदखेडे गावाजवळ असलेल्या बंद खांडसरीच्या बाजुला झाडा झुडपात काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल सायंकाळी छापा टाकला. जुगार खेळणार्‍या आबा रामा ठेलारी (वय 38 रा. आनंदखेडा), दिनेश निंबा ठाकुर (वय 43 रा. डोंगराळे, ता. मालेगाव), छोटु ऊर्फ माधव राजेंद्र बागुल (वय 27 रा. आनंदखेडा), हरीष दिलीपसिंग गिरासे (वय 28 रा. बळसाने, ता. साक्री), सुरेश खुशाल सावळे (वय 33 रा. शिरधाणे, ता.धुळे) यांना पकडले.

तर क्लब मालक मोहन राजेंद्र कोळी (रा. आनंदखेडा) हा फरार झाला. त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच घटनास्थळावरून चार मोटर सायकली व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 59 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोकॉ राकेश महाले यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोहेकॉ राजेंद्र मोरे, बापु रायते, पोना प्रविण पाटील, चेतन चव्हाण, राकेश महाले, धिरज सांगळे, ईश्वर पाटील, गजानन वरखेडे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या