Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआनंद लॉंड्रीचे भगतसिंग परदेशी यांचे निधन

आनंद लॉंड्रीचे भगतसिंग परदेशी यांचे निधन

नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील आनंद लॉंड्रीचे संचालक व नाशिकरोड येथील रहिवासी भगतसिंग लक्ष्मण परदेशी यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. परदेशी यांचे धोबी समाजासाठी मोठे योगदान होते. अतिशय खडतर परिस्थितीतून मजल दरमजल करत परदेशी यांनी नाशिक शहरात आनंद लॉंड्रीच्या अनेक शाखा सुरु केल्या आहेत.

- Advertisement -

परदेशी यांनी त्यांच्या निवासस्थानी सौरउर्जा प्रकल्प बसवला असून त्यांच्या घरी जी विजेची निर्मिती होते त्यातून त्यांचे संपूर्ण घर, कारखाना व दुकानाला वीजपुरवठा होतो. तसेच उरलेली वीज महावितरणला देखील ते देतात. त्यांच्या या कार्याचा गौरवदेखील अनेकदा नाशकात झाला.

परदेशी यांनी धोबी समाजातील आर्थिक अडचणी असलेल्या समाजबांधवांना मदतीचा हात देत त्यांच्यासाठी कार्य केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून समाजभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

घरात अतिशय शिस्तप्रिय असलेल्या परदेशी यांनी समाजात वेगळा पायंडा पाडलेला होता. एकत्रित कुटुंब पद्धतीचा अवलंब करत जवळपास ५८ जणांचे मोठे कुटुंबाचे ते कारभारी होते. काकांनी अवलंबलेला एकत्रित कुटुंबाचा वसा आम्ही यापुढेही असाच सुरु ठेवणार असल्याचे कुटुंबातील सदस्य सांगतात. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन भाऊ, चार मुली, दहा पुतणे, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या