Saturday, April 27, 2024
Homeनगरहिंदू संस्कृतीकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्याच पद्धतीने उत्तर देणार

हिंदू संस्कृतीकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्याच पद्धतीने उत्तर देणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

हिंदू संस्कृतीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले तर त्यास त्याच पद्धतीने उत्तर देणार असल्याचे स्पष्टोक्ती ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी शिर्डीत दिली.

- Advertisement -

शनिवार दि. 5 रोजी शिर्डी शहरात ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर संस्थानच्यावतीने भाविकांना भारतीय पेहरावात यावे या आवाहन करण्यात आलेल्या प्रवेशद्वार क्रमांक 4 जवळच्या फलकाचे पूजन करण्यात आले.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सदरच्या फलकावर आक्षेप घेतला असून संस्थानने सदरील फलक काढून टाकावे अन्यथा येत्या 10 डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन स्वतःच्या हाताने फलक काढून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकारात आता संस्थानच्या बाजूने ब्राह्मण महासंघ उभा राहिला आहे. यावेळी ब्राह्मण महासंघाने साईबाबा संस्थांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

श्री. दवे म्हणाले की, मंदिर हा काही पिकनिक पॉईंट नाही, त्यामुळे याठिकाणी येताना भारतीय पोशाखात यावे हे खूप चांगले आहे. काही लोक हा फलक काढण्यासाठी स्टंटबाजी करत असून त्यांना देखील त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. यावेळी शिवसेना महिला आघाडी तसेच भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या