Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशMilk Price : अमूल, मदर डेअरीचं दूध महागलं, उद्यापासून किती रुपये जास्त...

Milk Price : अमूल, मदर डेअरीचं दूध महागलं, उद्यापासून किती रुपये जास्त द्यावे लागणार? चेक करा नवे दर

दिल्ली | Delhi

महागाईचा दिवसागणिक भडका उडत असून त्याचे परिणाम आता दैनंदिन गरजेच्या गोष्टींवर होत असल्याचं पहायला मिळत आहे.

- Advertisement -

याच दरम्यान देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीनं दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. ही दरवाढ १७ ऑगस्टपासून होईल, असं या कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. या दरवाढीमुळं ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.

अमूल कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत ३१ रुपये तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत २५ रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्धा लिटरच्या पाकिटासाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या