Friday, April 26, 2024
Homeनगररिझर्व बँकेच्या जाचक निर्बंधांमुळे सहकारी बँका अडचणीत

रिझर्व बँकेच्या जाचक निर्बंधांमुळे सहकारी बँका अडचणीत

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

रिझर्व बँकेने (Reserve Bank) राष्ट्रीय व खासगी बँकांना (National and Private Banks) काहीशी मोकळीक दिली आहे. मात्र सहकारी बँकांना (Cooperative Bank) अत्यंत जाचक निर्बंध लावले आहेत. हे बँकिंगसाठी (Banking) भविष्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरणार आहे. बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काटेकोरपणाचा आहे. अमृतवाहिनी बँकेने (Amrutvahini Bank) सातत्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठी मदत केल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी काढले आहेत.

- Advertisement -

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Amrutvahini Sahakari Bank) 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अमित पंडित होते. तर व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe), बाजीराव पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख (Ranjit Singh Deshmukh), बाबासाहेब ओहोळ, उद्योगपती राजेश मालपाणी, गणपतराव सांगळे, संतोष हासे, बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, रामहरी कातोरे, बँकेचे संचालक राजेंद्र गुंजाळ, सुभाष पा. गुंजाळ, शिवाजी जगताप, गोरक्षनाथ सोनवणे, किसन सुपेकर, बाबासाहेब शिंदे, अ‍ॅड. लक्ष्मण खेमनर, कचरू फड, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, बापूसाहेब गिरी, बँकेचे मॅनेजर रमेश थोरात, माजी मॅनेजर लक्ष्मण वाघ आदी उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, बँकिंग व्यवस्था ही फार अडचणीची आहे. अत्यंत काटेकोरपणे कामकाज याठिकाणी करावे लागते. सातत्याने जाचक निर्बंध वाढत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये अमृतवाहिनी बँकेने तालुक्याची आर्थिक कामधेनू म्हणून काम करताना शेतकर्‍यांना व तरुणांना मोठी आर्थिक मदत केली आहे. वेळेत कर्ज परत करणे ही परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे. केंद्र सरकारने व रिझर्व्ह बँकेने नव्याने लागू केलेले निर्बंध सहकारी बँकांसाठी अत्यंत कडक आहेत.

मात्र हेच निर्बंध खाजगी व शासकीय बँकांना लागू नाहीत. काही सहकारी बँकांमध्ये चुकी असेल तर ती शिक्षा नक्की करा मात्र जे चांगले आहे त्यांच्या पाठीशी उभे रहा. काही मूठभर उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज माफ होते आणि पुन्हा ते नव्याने कर्ज घेतात. याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करते आहे आणि सहकारी बँका या गोरगरिबांच्या प्रपंचाशी निगडित असतात त्यावर मात्र अनेक जाचक निर्बंध लावतात हे मात्र न समजण्यासारखे आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, अमृतवाहिनी बँकेने तालुक्यातील शेतकरी, तरुण, उद्योजक यांना सातत्याने मोठी मदत केली आहे. संगमनेर तालुक्याने कर्जवसुलीची 100% परंपरा कायम राखली आहे. ही संस्था आपली असून प्रत्येकाने वेळेत कर्ज परत केले तर नव्याने पुन्हा ते सर्वांना सुलभतेने घेता येईल. बँकींगचे नियम प्रत्येकाने जपावे असे ते म्हणाले.

उद्योगपती राजेश मालपाणी म्हणाले, संगमनेरचा सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वातावरण खूप चांगले आहे. यामुळे संगमनेरचा लौकिक राज्यभर निर्माण झाला आहे. अडचणीच्या काळात अमृतवाहिनी बँक ही शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असल्याचे ते म्हणाले.

चेअरमन अमित पंडित म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या बँकेवर सभासद व शेतकर्‍यांचा मोठा विश्वास असून 450 कोटींच्या ठेवी आहेत. तर यावर्षी 652 कोटींचा व्यवसाय बँकेने केला आहे. कर्ज घेणार्‍यांनी नियमित कर्ज परत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी बापूसाहेब टाक, ज्ञानेश्वर काजळे, किशोर टोकसे, संतोष करवा, बाळासाहेब डांगरे आदी उपस्थित होते. यावेळी नोटीस वाचन बँकेचे मॅनेजर रमेश थोरात यांनी केले तर दत्तात्रय खुळे यांनी आभार मानले.

आदर्शवत नियमित कर्जदारांचा बँकेकडून सन्मान

अमृतवाहिनी बँकेने सातत्याने शेतकरी उद्योजकांना मदत केली आहे. या बँकेतून कर्ज घेऊन त्यातून नवीन उद्योग सुरू करणे बरोबर शेतीमधून आदर्शवत समृद्धी निर्माण केल्याप्रकरणी समृद्धी निर्माण करत इतरांपुढे आदर्श निर्माण करणारे व नियमित कर्जफेड करणारे कर्जदार के. बी. घुले, सोमनाथ गुंजाळ, बाबासाहेब पावसे यांच्यासह करोना संकटामध्ये पालक गमवलेल्या 14 मुलींचे पालकत्व घेणारे नितीन हासे यांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या