Wednesday, April 24, 2024
Homeनगरअमृतसागर दूध संघ निवडणूक; 'एवढे' अर्ज वैध

अमृतसागर दूध संघ निवडणूक; ‘एवढे’ अर्ज वैध

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी होऊन 95 उमेदवारी अर्जांपैकी 93 अर्ज वैध ठरले आहे. अर्ज माघारीची मुदत 5 डिसेंबर पर्यंत आहे. अर्ज माघारीनंतरच खर्‍या अर्थाने निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सायंकाळनंतर एक उमेदवार वगळून निर्णय जाहीर केले. गुरुवारपर्यंत संचालक मंडळांच्या 15 जागांसाठी 57 व्यक्तींनी 95 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात मागील पंचवार्षिक काळातून 3 वर्षांतील संकलित दूध पुरवठ्याची किचकट अट विचारात घेण्यात न आल्याने मोठ्या संख्येत अपात्र उमेदवार व माजी संचालकांसह मातब्बर पदाधिकार्‍यांना दिलासा मिळाला. विशेषकरून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल 80 टक्के दाखल अर्ज अपात्र ठरतील अशा अफवांना पूर्णविराम मिळाला.

महिला राखीव मतदारसंघातून कुमुदिनी सदाशिव पोखरकर यांचा अर्ज अपात्र ठरला. ब्राह्मणवाडा येथील एका तीन अपत्ये असल्याबद्दल अर्जदाराच्या अपत्यांची शालेय दाखले सादर करून व आक्षेप घेऊन देखील तीन अपत्य अर्जावर उशिरापर्यंत निर्णय न घेण्यात आल्याने अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात विलंब झाला. मात्र 95 दाखल अर्जातून 93 अर्जदार उमेदवारीस पात्र ठरले आहेत. यात वैध ठरविण्यात आलेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत.

शिवाजी लक्ष्मण नवले, शिवाजी लक्ष्मण नवले, शंकर बाबुराव डगळे, विठ्ठल केरुजी डुंबरे, सोपान काशिनाथ मांडे, अरुण दिनकर गायकर, अर्चना गौराम गजे, गंगाराम पुंजा धुमाळ, कैलास रामनाथ पुंडे, रेवचंद गणपत भोर, राजेंद्र शिवनाथ वाकचौरे, कैलास गोविंद जाधव, भाऊसाहेब कारभारी कासार, सुभाष विठ्ठल बेनके, भानुदास नाना डोंगरे, दत्तात्रय दगडु वाकचौरे, प्रतापराव लक्ष्मण देशमुख (2 अर्ज), भाऊपाटील भिमाजी नवले (2 अर्ज), गोरक्ष गणपत मालुंजकर – सर्वसाधारण प्रतिनिधी (2 अर्ज), बबन किसन चौधरी, सतिश जयराम फापाळे, लताबाई अशोक देशमुख, शरद कारभारी चौधरी (2 अर्ज), जगन वसंत देशमुख, गंगाधर गणपत नाईकवाडी, रामदास किसन आंबरे, रावसाहेब रामराव वाकचौरे, आश्विनी प्रवीण धुमाळ, वैभव मधुकर पिचड (4 अर्ज), कैलास भास्कर वाकचौरे, प्रकाश आण्णासाहेब देशमुख, दादापाटील वाकचौरे, प्रकाश संपत नाईकवाडी, नंदा सदाशिव कचरे, अरुण मारुती देशमुख, दिपाली अनिल देशमुख, विजय श्रावणा विघे, बाळासाहेब भाऊराव मुंढे (2 अर्ज), धारक चित्रा प्रताप, सुभाष सुर्यभान डोंगरे, आप्पासाहेब दादापाटील आवारी, दयानंद नामदेव वैद्य, गवराम माधव ताजणे, गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे (2 अर्ज), सुनिल निवृत्ती देशमुख, रविंद्र पोपट हांडे, नलिनी भाऊसाहेब गायकर, आबाजी काशिनाथ तळेकर, पांडुरंग भिवाजी कचरे, शोभा विठ्ठल आरोटे, विजय रंगनाथ शिंदे, किसन बबन हांडे, नंदू संपत गंभीरे, बाबुराव शंकर बेनके तर शेवटच्या दिवशी दाखल अर्जदारात पंचायत समितीचे माजी सभापती व दूध संघाचे माजी संचालक विठ्ठलराव शंकर चासकर, आनंदराव वाकचौरे, सुरेश गडाख, शिवसेनेचे नेते महेश नवले, रामहरी तिकांडे यांच्यासह दाखल सर्व अर्ज मंजूर झाले.

माजी आमदार व अमृतसागर दूध संघाचे हंगामी अध्यक्ष वैभव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी भाजपप्रणित उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरणार नाहीत, यावर लक्ष केंद्रित केले तर भाजपेतर सर्वपक्षीय उमेदवारांचे अर्ज जास्तीत जास्त अपात्र कसे ठरतील याचीही व्यूहरचना आखण्यात आली होती पण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून तीन वर्षांतून 300 दिवस प्रत्येकी 150 लिटर दूध पुरवठा संकलनाची वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला उपविधीच बासनात गुंडाळून ठेवल्याने या अटीवर अपात्र ठरणारे 30 टक्के अर्जदार उमेदवारी करण्यास पात्र ठरल्याने या निवडणुकीत रंगत अधिकच वाढत आहे. मात्र भाजप व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पदाधिकार्‍यांसह अनेक मातब्बर उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरतील असे वाटत असतानाच ते वैध ठरविण्यात आले. यांच्यामुळेच भाजप व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतृत्वासमोरील डोकेदुखीत वाढ होणार, हे नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या