अमृतसागरसाठी 64 उमेदवारी अर्ज

jalgaon-digital
6 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अमृतसागर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत 64 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात अर्ज भरणार्‍यांमध्ये माजी आमदार व दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे,ज्येष्ठ नेते अ‍ॅड. के. बी. हांडे, माजी पं. स. सदस्य आप्पासाहेब आवारी आदी प्रमुख नेत्यांसह अनेक आजी- माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवारी अंतिम दिवस असल्याने अजून किती जण अर्ज दाखल करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अमृतसागर सहकारी दूध संघाचा संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला.अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील पहिलीच सहकारी संस्थेची निवडणूक होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रमातील निवडणूक कार्यालयाचे ठिकाण अहमदनगर ऐवजी आता अकोले येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करण्यात आले आहे.त्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांची नगर वारी आता थांबली आहे.

उर्वरित निवडणूक कार्यक्रम हा ठरल्याप्रमाणे व जाहीर झाल्या प्रमाणेच असणार आहे. या करण्यात आलेल्या बदलास सहा. सहकारी निवडणूक आयुक्त वसंत पाटील यानी मान्यता दिली असून तसे प्रसिध्द करावे अशा सुचना केल्या आहेत. पूर्वी जाहिर झालेल्या कार्यक्रमामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची दि.11 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022, उमेदवारी अर्ज छाननी दि.18 नोव्हेंबर 2022 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि.21 नोव्हेंबर 2022 ते 5 डिसेंबर 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.उमेदवारांना निशाणीचे वाटप 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल.तसेच आवश्यकता वाटल्यास 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.मतमोजणी मतदान संपल्या नतर लगेच होईल.संघाच्या सर्वसाधारण 10,महिला राखीव 2,इतर मागास वर्ग 1,अनुसूचित जाती जमाती 1,भटक्या विमुक्त जाती 1 अशा एकुण 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.असे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पराये यांनी सांगितले. तर सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश नारायण कापसे, सहकार अधिकारी, श्रेणी -2, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. अकोले हे काम पहात आहेत.

काल बुधवारी संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी 64 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात अनेकांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरल्याने हि संख्या जास्त दिसत आहे.

काल अन्य उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये 1) नवले शिवाजी लक्ष्मण – सर्वसाधारण प्रतिनिधी, 2) नवले शिवाजी लक्ष्मण – सर्वसाधारण प्रतिनिधी, 3) डगळे शंकर बाबुराव – अनु जाती / जमाती प्रतिनिधी, 4) डुंबरे विठ्ठल केरुजी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 5) मांडे सोपान काशिनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 6) गायकर अरुण दिनकर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 7) गजे अर्चना गौराम – महिला राखीव प्रतिनिधी, 8) धुमाळ गंगाराम पुंजा – सर्वसाधारण प्रतिनिधी, 9) पुंडे कैलास रामनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी,10) भोर रेवचंद गणपत – सर्वसाधारण प्रतिनिधी, 11) वाकचौरे राजेंद्र शिवनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 12 ) जाधव कैलास गोविंद – सर्वसाधारण प्रतिनिधी, 13) कासार भाऊसाहेब कारभारी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 14) बेनके सुभाष विठ्ठल – भ.जा.वि.ज./विमाप्र प्रतिनिधी, 15) डोंगरे भानुदास नाना – सर्वसाधारण प्रतिनिधी, 16) वाकचौरे दत्तात्रय दगडु – सर्वसाधारण प्रतिनिधी, 17) देशमुख प्रतापराव लक्ष्मण – सर्वसाधारण प्रतिनिधी, 18) देशमुख प्रतापराव लक्ष्मण – सर्वसाधारण प्रतिनिधी, 19 ) नवले भाऊपाटील भिमाजी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 20) नवले भाऊपाटील भिमाजी – इतर मागासवर्ग प्रतिनिधी, 21 ) गोरक्ष गणपत मालुंजकर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 22) गोरक्ष गणपत मालुंजकर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 24)चौधरी बबन किसन – सर्वसाधारण प्रतिनिधी, 24)फापाळे सतिश जयराम – सर्वसाधारण प्रतिनिधी, 25) देशमुख लताबाई अशोक – महिला राखीव प्रतिनिधी, 26) चौधरी शरद कारभारी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 27) चौधरी शरद कारभारी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 28) पोखरकर कुमुदिनी सदाशिव – महिला राखीव प्रतिनिधी, 29) देशमुख जगन वसंत – सर्वसाधारण प्रतिनिधी, 30) नाईकवाडी गंगाधर गणपत – सर्वसाधारण प्रतिनिधी, 31) आंबरे रामदास किसन – सर्वसाधारण प्रतिनिधी, 32) वाकचौरे रावसाहेब रामराव – सर्वसाधारण प्रतिनिधी, 33) धुमाळ आश्विनी प्रवीण – महिला राखीव प्रतिनिधी, 34) पिचड वैभव मधुकर – अनु जाती / जमाती प्रतिनिधी, 35) पिचड वैभव मधुकर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 36) पिचड वैभव मधुकर – अनु जाती / जमाती प्रतिनिधी, 37) पिचड व मधुकर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 38) वाकचौरे कैलास भास्कर – सर्वसाधारण प्रतिनिधी, 39) देशमुख प्रकाश आण्णासाहेब – इतर मागासवर्ग प्रतिनिधी, 40) वाकचौरे दादापाटील रामभाऊ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 41) नाईकवाडी प्रकाश संपत – सर्वसाधारण प्रतिनिधी, 42) कचरे नंदा सदाशिव – महिला राखीव प्रतिनिधी, 43) देशमुख अरुण मारुती – सर्वसाधारण प्रतिनिधी, 44) देशमुख दिपाली अनिल – महिला राखीव प्रतिनिधी, 45) धिपे विजय श्रावणा – सर्वसाधारण प्रतिनिधी, 46) मुंढे बाळासाहेब भाऊराव – अनु जाती / जमाती प्रतिनिधी, 47) मुंढे बाळासाहेब भाऊराव – सर्वसाधारण प्रतिनिधी, 48) धारक चित्रा प्रताप – वि.जा.भ.ज. / विमाप्र प्रतिनिधी, 49) डोंगरे सुभाष सुर्यभान – सर्वसाधारण प्रतिनिधी, 50) आवारी आप्पासाहेब दादापाटील – सर्वसाधारण प्रतिनिधी 51) वैदय दयानंद नामदेव – सर्वसाधारण प्रतिनिधी, 52) ताजणे गवराम माधव – सर्वसाधारण प्रतिनिधी 53) शेवाळे गुलाबराव पंढरीनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 54) शेवाळे गुलाबराव पंढरीनाथ – इतर मागासवर्ग प्रतिनिधी, 55) देशमुख सुनिल निवृत्ती – सर्वसाधारण प्रतिनिधी, 56 ) हांडे रविंद्र पोपट – सर्वसाधारण प्रतिनिधी, 57) गायकर नलिनी भाऊसाहेब – महिला राखीव प्रतिनिधी, 58) तळेकर आबाजी काशिनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 59) कचरे पांडुरंग भिवाजी – सर्वसाधारण प्रतिनिधी, 60) आरोटे शोभा विठ्ठल – महिला राखीव प्रतिनिधी, 61) शिंदे विजय रंगनाथ – सर्वसाधारण प्रतिनिधी, 62) हांडे किसन बबन – सर्वसाधारण प्रतिनिधी, 63) गंभीरे नंदु संपत – अनु जाती / जमाती प्रतिनिधी, 64) बेनके बाबुराव शंकर – वि.जा.भ.ज. / विमाप्र प्रतिनिधी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *