Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअमरावती-मुंबई विशेष रेल्वे सुरु होणार

अमरावती-मुंबई विशेष रेल्वे सुरु होणार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वे नाशिकरोडमार्गे अमरावती-मुंबई विशेष आरक्षित रेल्वे गाडी दि. 25 जानेवारीपासून सुरु करणार आहे.

- Advertisement -

गाडी क्रमांक 02112 अप अमरावती – मुंबई गाडी दररोज अमरावतीहून 19.10 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी मुंबईला 6.15 वाजता पोहचेल. डाऊन मुंबई – अमरावती गाडी मुंबईहून 19.55 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी अमरावतीला 7.55 वाजता पोहचेल.

नाशिकरोड, भुसावळ, जळगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर येथे ती थांबेल. पुरी-अजमेर विशेष गाडी 21 जानेवारीपासून दर सोमवार, गुरुवारी पुरीहून 23.05 वाजता निघेल. तिसर्‍या दिवशी अजमेरला पोहचेल. बडनेरा, अकोला, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगांव येथे ती थांबेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या