Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणतांब्यात बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे - सराळकर

पुणतांब्यात बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे – सराळकर

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

सुशिक्षित बेरोजगार तरुण कुटुंबाची उपजिवीका करण्यासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे बाहेरगावी स्थलांतर करणारांची संख्या वाढत आहे. म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना गावात रोजगार उपलब्ध करण्यासाठी परिसरात औद्योगिकरण करून रोजगार निर्मीतीसाठी सर्व समावेशक प्रयत्न केले पाहिजे, असे सामाजिक कार्येकर्ते अमोल सराळकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

1983-84 ला चांगदेवनगर शुगर मिल्स बंद झाल्यानंतर येथे कोणताही रोजगार निर्माण झाला नाही. उलट शेतीचे हक्काचे पाटपाणी कमी होऊन हा परिसर उजाड होण्यास अनेक कारणे आहेत. कधी नैसर्गिक आपत्ती तर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर यांना भाववाढीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरीही परिसरातील शेतकरी शेतमजूर आजही तग धरून आहे ही जमेची बाजू मानली जाते.

पुणतांबा परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचा विस्तार होत असून त्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होत नाही. येथील रोजगार शेतीशी निगडीत आहे. शेतमजुरीवर अनेक कुटुंबाची उपजिवीका चालते. परंतु याला मर्यादा आहे. कारण सर्वच तरुणांना शेतीतील कामे येतील असे नाही. याप्रमाणे महिलांचेही तसेच आहे. ठराविक महिला या कामात गुंतलेल्या आहेत. परंतु अनेक तरुणांसह मुली, महिला उच्चशिक्षीत आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षण व कौशल्यानुसार रोजगार मिळणे आवश्यक आहे. यासाठी परिसरात औद्योगिक रोजगार निर्माण होण्यासाठी सर्व समावेशक प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सराळकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या