Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजिल्ह्यावर आता डेल्टा प्लसचे संकट

जिल्ह्यावर आता डेल्टा प्लसचे संकट

करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन स्ट्रेंटने डोकं वर काढल्याने राज्यात खळबळ माजली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता राज्यात जळगाव, रत्नागिरी, पालघर, सिंधूदुर्ग व ठाणे याठिकाणावरील रुग्णांना कोरोनाचा नवीन स्ट्रेंट डेल्टा प्लसची लागण झाली आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लसचे 7 रुग्ण एकाच भागातील असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाचा हा नवीन स्ट्रेंट किती घातक ठरणार ही येणारी वेळच ठरवेल… गेल्या महिनाभरापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाल्याने संपुर्ण राज्यातील निर्बंध शिथील करुन हळूहळू सर्व अनलॉक करण्यात आले आहे. परंतु अनलॉक होताच नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून तिसर्‍या लाटेचा इशारा देखील देण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र तिसर्‍या लाटेपूर्वीच कोरोना विषाणूतजणूकीय बदल होत राज्यात डेल्टा प्लस या कोरोनाचा नवीन स्टे्ंरट रुग्णांमध्ये आढळून आला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी व जळगाव जिल्ह्यातील आहे. परंतु हे रुग्ण करोनाबाधित असतांना 15 मे रोजी तपासणीसाठी नेण्यात आले होते.

त्यानंतर आता सुमारे सव्वा महिन्यानंतर या नमुन्यांमध्ये नवीन स्टे्ंरट आढळल्याने राज्यावर करोनाचे नवीन संकटाचे ढग गडद होवू लागले आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णांनी घरीच उपचार घेवून ते ठणठणीत झाल्याचा दावा जिल्हाधिकार्‍यांनी केला. मात्र त्यावर अजून वैज्ञानिकांचे संशोधन सुरु असून तो कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील विषाणूपेक्षा घातक आहे की केवळ त्याचा स्टे्रंट बदलला आहे याबाबत अजून काहीच माहिती नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

तसेच नवीन स्ट्रेंट आढळून आलेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस देखील घेतली नसून लसीकरण झालेल्यांना देखील या नवीन स्ट्रेंट डेल्टाचा धोका राहणार का? यासह अनेक प्रश्नांबाबत प्रशासन अनुत्तरीत आह.े त्यामुळे नागरिकांनी नवीन स्ट्रेंटपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायरचा वापर याच त्रिसूत्रीचा वापर हेच यावरील शस्त्र म्हणता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या