Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयगृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज(७ फेब्रुवारी) एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. खासदार नारायण राणे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयचं ते उद्घाटन करणार आहेत. सिंधुदुर्गात अमित शाह यांची उपस्थिती भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

अमित शहा हे दुपारी १.५० वाजता गोवा येथून हेलिकॉप्टरने पडवे मेडिकल कॉलेज येथे येणार असून उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते दोन तास सिंधुदुर्गांत थांबणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार खासदार व भाजपची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा सिंधुदुर्गात सहयांची मोहिम राबविणार आहे. भाजपसाठी हा दौरा निश्चितच फलदायी आहे. केंद्रांच्या योजना घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा कार्यकारिणीत करण्यात आले. यादरम्यान, सिंधुदुर्ग येथील ‘लाईफटाईम’ वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग येथील ‘लाईफटाईम’ वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत.

दरम्यान, अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजपने बाजी मारली पाहिजे, असं मत देखील राणे यांनी व्यक्त केलं आहे.

कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय. अमित शाह यांच्या दौऱ्याने कोकणात भाजपला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते पण शेतकरी आंदोलकांनी चक्का जाम पुकारल्याने हा दौरा रद्द करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या