Friday, April 26, 2024
Homeनगरजैन स्थानक संघ इमारत बांधकाम नियमित करण्यासाठी उपोषण

जैन स्थानक संघ इमारत बांधकाम नियमित करण्यासाठी उपोषण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील स्थानाकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांनी स्थानकाच्या केलेल्या इमारतीच्या प्लॅनला नगरपालिकेकडून गेल्या 15-20 वर्षांत कायदेशीर मंजुरी न घेता बांधकाम केले आहे. नगरपालिकेने प्लॅन मंजूर करावा किंवा विश्वस्तांनी मंजुरीच्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम नियमित करावे अन्यथा अध्यक्ष व विश्वस्त यांचेविरुध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समाजिक कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी काल गुरुवारी सकाळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

- Advertisement -

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपोषणार्थी व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना सायंकाळी 5 वा. नगरपालिका कार्यालयामध्ये चर्चेसाठी बोलावून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी समाजातील ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी म्हणाले, जैन स्थानकाची होत असलेली वास्तू ही कायदेशीर वास्तू असावी. भविष्यात तरुण पिढीला त्यासंदर्भात काहीही बेकायदेशीरपणासाठी प्रयत्नांची वेळ येऊ नये. आम्ही व अमित मुथ्था यांनी बांधकाम प्लॅन मंजुरीसाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झाली नाही. स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यावेळी म्हणाले, अमित मुथ्था यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त आहे.स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांना आम्ही वेळोवेळी पत्र दिले. समक्ष बोलावले परंतु अद्याप त्यांचेकडून पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्थानक बांधकाम मंजुरीचे प्रकल्प प्रलंबित आहे. आम्ही त्यांना मंजुरीच्या कामासाठी व कागद पत्रासाठी 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्यात ही पूर्तता झाली नाही तर नगरपालिका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करील, त्यामुळे अमित मुथ्थांनी उपोषण मागे घ्यावे तसे लेखी आश्वासन दिले.आश्वासनानंतर अमित मुथ्था यांचे उपोषण मुख्याधिकारी शिंदे यांनी सरबत देऊन सोडलेे.

यावेळी मुथ्था यांचे समवेत अभय मुथ्था, सतीश चोरडिया, किरण लुणिया, रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, राजेंद भंडारी, हेमंत खाबिया, मनसुख चोरडिया, प्रकाश समदडिया, दिलीप लोढा, दीपक गांधी, दीपक संघवी, सचिन गुंदेचा, रोहित भंडारी, सुमित गांधी, सचिन समदडीया, गिरीश बाठिया, महेश सोनी,हर्ष चोरडिया, मनोज बोरा आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या