Wednesday, May 8, 2024
Homeनगरअमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा

अमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेअर व क्रिप्टो ट्रेडींगमध्ये गुंतववणूक करा भरपूर कमिशन व फायदा मिळेल असे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत विशाल प्रकाश पवार (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरून सुशिलकुमार केशव शिसोदिया, शैलेष सुशिलकुमार शिसोदिया, सुषमा सुशिलकुमार शिसोदिया (सवर् रा. संजय हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. 35, उस्मानपुरा औरंगाबाद, ह.मु. आचार्यनगर, वसमत रोड, सांरग स्वामी शाळेजवळ, परभणी), नामदेव दत्तात्रय नाईकपाटील (रा. अष्टविनायक संकुल, मधुरभोज हॉटेल समोर, वसमत रोड, परभणी), नितीन बाळासाहेब लांडे (रा. मोरगे वस्ती, वॉर्ड नं.7, श्रीरामपूर), अशोक सूर्यभान डांगे, बेबी अशोक डांगे (रा. पुणतांबा, ता. राहाता) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशिलकुमार व शैलेष शिसोदिया यांची सी. सी. ट्रेडर्स भागीदारी फर्म आहे.नितीन लांडे व अशोक डांगे हे आपल्या ओळखीचे असून त्यांनी सी.सी.ट्रेडर्समध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले.त्यानुसार आपण व प्रसाद बाजीराव देशमुख यांनी विश्वास ठेवला.सुशिलकुमार व शैलेष शिसोदिया यांनी आमचा शेअर ट्रेडिंग 2003 पासून व क्रिप्टो ट्रेडिंग 2015 पासून व्यवसायाचा अनुभव आहे, ट्रेडिंगच्या माध्यमातून कमिशन व फायदा मिळवून दिल्याचे सांगितले.सुषमा शिसोदिया व नामदेव नाईक पाटील यांनी सुशिलकुमार व शैलेष शिसोदिया यांच्या फर्ममध्ये पैसे गुंतविले व आम्हाला चांगला परतावा मिळाल्याचे सांगितले.

आपण एच. डी. एफ. सी. बँक शाखा अहमदनगर यांचे 30 लाख रूपयांचे कर्ज घेतले व साडेचार लाख रूपये नातेवाईकांकडुन उसनवार घेतले. आपण 22 लाख 84 हजार 500 व देशमुख यांनी 16 लाख 17 हजार 500 रूपये एवढी रक्कम शिसोदिया यांच्या इंडसइंड बँक शाखा औरंगाबाद व युनियन बँक शाखा औरंगाबाद या खात्यावर जमा केली. त्यानंतर त्यांनी आपल्याला 8 लाख 64 हजार 564 रूपये व देशमुख यांना 1 लाख 99 हजार 516 रूपये परत केले. प्रत्येक महिन्याचे कमिशन पोटी ट्रेंडिंग प्रॉफीट म्हणून 24 महिने प्रतिमहिना 2 लाख 82 हजार 30 रूपये इतकी रक्कम व एकुण ट्रेडिंग प्रॉफीट म्हणून रु. 67 लाख 68 हजार 720 रूपये देऊ असे आश्वासन दिले. त्यापोटी 5 लाख 64 हजार 60 रूपयांचा धनादेश दिला.

तसेच आगाऊ तारखेचे सात धनादेशही दिले.त्यापैकी दोन धनादेश वटले नाही म्हणून वेळेवेळी पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी बहाणा करून रक्कम देण्याचे टाळले. दरम्यान 26 फेब्रुवारी 2019 रोजी पैसे परत देण्याचा करारनामा करुन दिला. मात्र पैसे दिले नाही. फसवणुक केल्याप्रकरणी 22 जुलै 2021 रोजी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन शहर पोलिसांत वरील सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. मात्र ठरल्याप्रमाणे परतावा न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुलदीप लक्ष्मण सोळसे ( गोंधवणी रोड, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे, सचिन प्रल्हाद जगतकर कम्युनिटी कॉमर्स ट्रेडर्स प्रा.लि एम.आय.डी.सी चिकलठाणा, एल्डोरा बिल्डींग, औरंगाबाद तसेच राजेश अरुण बारस्कर -रामानंद नगर बस स्टॉप जळगाव, जि. जळगाव व किरण बाबासाहेब नवले-कांदा मार्केट मागे, श्रीरामपूर यांनी कम्युनिटी कॉमर्स ट्रेंडर्स प्रा.लि. कंपनीमध्ये 22 लाख 31 हजार गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले. मात्र ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही.वेळोवेळी मागणी करून देखील पैसे दिले नाही.याबाबत श्रीरामपूर सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाच्या आदेशाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या