Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापालिका कर्मचार्‍यांना 7 हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान

महापालिका कर्मचार्‍यांना 7 हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवाळीसाठी मनपा कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

- Advertisement -

मात्र, मनपाकडून अवघे 7 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त लहारे यांनी दिली. दरम्यान, कर्मचारी संघटना 20 हजार रुपयांवर अडून बसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले नाही तर कर्मचारी सामूहिक आंदोलन करतील ,असा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे.

दहा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. करोना संकट काळात महापालिका कर्मचार्‍यांनी जीव धोक्यात घालून काम केले. काहींचा जीवही गेला. कर्मचारी कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी महापालिका कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी युनियनने केली आहे. 30 ऑक्टोबरला उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यासोबत बैठक झाली होती.

त्यात तोडगा निघाला नव्हता. मंगळवारी पुन्हा दुसर्‍यांदा आयुक्तांकडे बैठक झाली. आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, आयुब शेख बैठकीला उपस्थित होते. वीस हजार रुपयांची मागणी लोखंडे यांनी कायम ठेवली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. वसुली झालेली नाही असे सांगत एवढे सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याची भूमिका आयुक्त मायकलवार यांनी मांडली. या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली.

दरम्यान मनपाच्या वतीने 7 हजार रूपये देण्याचा निर्णय झाला आहे. दिवाळीपूर्वी 5 हजार रूपये देण्यात येतील व वसूली 50 टक्क्याच्या पुढे झाली तर डिसेंबर अखेरपर्यंत 2 हजार देण्यात येतील असे एकुण 7 हजार रूपये देण्याचा मनपाच्यावतीने घेण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त लहारे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या