Thursday, April 25, 2024
Homeनगरपाणीपातळीचा अहवाल आल्यानंतर उपाययोजना करणार - सभापती अविनाश घुले

पाणीपातळीचा अहवाल आल्यानंतर उपाययोजना करणार – सभापती अविनाश घुले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुळाधरणामध्ये मुबलक पाणीसाठा असतांनाही शहरामध्ये नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

यासाठी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी पाणी पुरवठा विभागाची बैठक घेऊन शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपातळी मोजण्याचे काम हाती घेतले असून पुणे येथे एजन्सी मार्फत आज मुळाधरणातून पाण्याचा होणारा उपसा व याचबरोबर विळद व वसंतटेकडी येथील पाण्याच्या पातळीची तपासणी करण्याचे काम आज सुरू करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक गणेश भोसले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख इंजिनिअर परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पाहणी केली.

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले की, येत्या दोन दिवसात पुणे येथील एजन्सी कडून पाणी पातळी तपासणीचा तसेच तृटीचा अहवाल येणार आहे. त्यानंतर लगेच आयुक्त शंकर गोरे व पाणीपुरवठा विभागाची तात्काळ बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

याचबरोबर नगर शहराला मुळा धरणातून अमृत पाणी योजनेची दुसरी लाईन टाकण्याचे काम हे कामही अंतिम टप्यात आलेले आहे. या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला पुर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या