Wednesday, April 24, 2024
Homeनगर..आता नगर मनपाच्या शाळेतील मुलांना घरबसल्या शिक्षण

..आता नगर मनपाच्या शाळेतील मुलांना घरबसल्या शिक्षण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळामुळे खासगी शाळांतील मुलांना सध्या घरबसल्या शिक्षकांचे मार्गदर्शन ऑनलाईन मिळत असताना आता ही सुविधा

- Advertisement -

महापालिकेच्या चार शाळांतील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध झाली आहे. येथील निर्मिक फाउंडेशनने या मुलांसाठी ई-लर्निंग सुविधा दिल्याने मनपाच्या चार शाळांतील 264 मुलांना त्यांचे शिक्षक ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन करीत आहेत. येत्या काही दिवसातच मनपाच्या अन्य 8 शाळांनाही असे साहित्य निर्मिक संस्थेद्वारे उपलब्ध होणार असल्याने सर्व शाळांतून ई-लर्निंग या आधुनिक प्रणालीद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवणार आहेत.

मनपाच्या केडगाव येथील ओंकारनगर या पहिल्या आयएसओ शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांच्या पाठपुराव्यामुळे निर्मिक फाउंडेशनद्वारे मनपाच्या चार शाळांतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य उपलब्ध झाले आहे. मनपाच्या ओंकारनगर (विद्यार्थी संख्या 79), सावेडी शाळा (105), भुतकरवाडी शाळा (42) व सर्जेपुरा ऊर्दू शाळा (38) अशा 264 विद्यार्थ्यांसाठी 4 प्रोजेक्टर, 4 प्रोजेक्टर स्क्रीन, 4 साउंड, 4 इंटरनेट डोंगल, 4 अभ्यासक्रमाचे पेन ड्राईव्ह, 4 माऊस, 4 प्रोजेक्टर स्टॅण्ड दिले गेले आहेत.

या माध्यमातून ओंकारनगर शाळा झुम पवर रोज ऑनलाईन क्लास घेत आहे तसेच या चारही शाळा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण पद्धती राबवत आहे. सर्व शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या साहित्याचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक कबाडी यांनी व्यक्त केला. निर्मिक फाउंडेशन मनपाच्या सर्व 12 शाळांना हे साहित्य देणार आहे. आणखी तीन महिन्यांच्या टप्प्या-टप्प्याने राहिलेल्या 8 शाळांना हे प्रत्येकी 36 हजार रुपये किमतीचे साहित्य मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या