Friday, April 26, 2024
Homeनगरमहानगरपालिकेची बुधवारी महासभा

महानगरपालिकेची बुधवारी महासभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करू की नको, या द्विधा मनस्थितीत असलेले महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अखेर महासभेच्या अजेंड्यावर एकदाची सही केली.

- Advertisement -

बुधवारी 10 तारखेला स्थायी समितीचे नवीन सदस्य नियुक्तीसाठी ही सभा बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

1 फेब्रुवारीला स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. ज्या पक्षाचे जितके निवृत्त झाले तितकेच त्या पक्षाचे नवे सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत. स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची चढाओढ लागली आहे.

स्थायी समिती सदस्य नियुक्ती करताना राजकीय पक्षाच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढते. त्यामुळे महासभा वेळेवर निघत नसल्याचे आजवर नगरकरांनी अनुभवले. पण यंदा मात्र तसं काही झालं नाही. अगदी वेळेत नवीन स्थायी समिती सदस्य निवडीसाठी सभा बोलविण्यात आली आहे. बुधवारी रात्रीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून महासभेच्या अजेंड्यावर सही केली. 10 तारखेला स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महासभा बोलविण्यात आली आहे.

या सभेत गटनेत्यांकडून बंद पाकिटात नियुक्त करावयाच्या सद्स्यांची नावे महापौरांकडे सादर केली जातील. महापौर महासभेत नवीन सदस्य नियुक्तीची घोषणा करतील. त्यानंतर परिपूर्ण स्थायी समितीच्या सदस्यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जाईल. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीच्या वाकळेंचा दावा

स्थायी समितीचे सभापती पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे यांची धावपळ सुरू आहे. त्याचबरोबरीने समदखान, डॉ. सागर बोरुडे यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपकडूनही सभापती पदासाठी जुळवणी सुरू आहे. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सभापती पद मिळविले होते. सभापती पदाच्या निवडणुकीनंतर जूनमध्ये महापौर पदाची निवडणूक होणार आहे. महापौर पद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडे हा राखीव उमेदवारच नाही. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी भाजपने सभापती पदासाठी फिल्डींग लावली आहे.

कोणाचे किती-

राष्ट्रवादी – 02, शिवसेना – 03, भाजप- 02, बसपा- 01

- Advertisment -

ताज्या बातम्या