Friday, April 26, 2024
Homeनगरमनपाचे कोविड सेंटर लॉक

मनपाचे कोविड सेंटर लॉक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता प्रादूर्भाव कंट्रोल करण्यासाठी नगर शहरात मोफत कोवीड उपचार केंद्र सुरू करून गरिबांना आधार देणार्‍या महापालिकेने आता मात्र सगळेच सेंटर बंद केले आहेत.

- Advertisement -

परिणामी फुकटात मिळणारे कोरोना उपचार आता नगरकरांना यापुढे मिळणार नाहीत. मात्र खूपच गरज असेल तर त्याला मात्र सिव्हील हॉस्पिटलमध्ये फ्री सेवा मिळू शकणार आहे.

मार्चमध्ये सुरू झालेला करोना कहर दिवसागणिक वाढत गेला. खर्चिक उपचार घेणे परवडत नसल्याने महापालिकेने शहरात चार ठिकाणी मोफत सुविधा केंद्र सुरू केले. तेथे करोनाग्रस्तांवर मोफत उफचार करण्यात आले.

मात्र आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमालाची घटल्याने महापालिकेने हे मोफत उपचार केंद्रच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद लॉन्स येथून सुरूवात झालेली बंदची मालिका नटराज सेंटरवर येवून संपली. महापालिकेने मोफत करोना उपचार केंद्र बंद झाल्याने आता खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे मोजून नगरकरांना उपचार घ्यावे लागणार आहे. अत्यंत गरीब असेल अशांना मात्र सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येऊ शकतील अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

बूथचे अनुदानही बंद

करोनाग्रस्तांवर मोफत उपचार करणार्‍या बूथ हॉस्पिटलला महापालिका दैनंदिन खर्च देत होती. आता हा खर्चही 1 डिसेंबरपासून बंद करण्यात आला आहे. तुम्ही तुमची स्वतंत्र व्यवस्था करा असे महापालिका प्रशासनाने बूथ प्रशासनाला कळविले आहे. आयुक्त मायकलवार यांनीही त्याला दुजोरा दिला. बुथ हॉस्पिलमध्ये आतापर्यंत 35 हजार करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. त्यातील सगळेच ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. अजूनपर्यंत कोणाकडून कोणतेच शुल्क घेतले नाही. अजूनही 39 करोनाग्रस्तावर मोफतच उपचार सुरू आहेत, अशी माहिती बूथचे व्यवस्थापक देवदान कळकुंभे यांनी दिली.

पाच कोटींवरून दोन कोटींवर

महापालिकेने बूथ हॉस्पिटलचा दैनंदिन खर्च करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुथने महापालिकेला पाच कोटी रुपयांचे बिल पाठविले. ते महापालिकेने अमान्य केले. पगार, लाईटबिल व इतर किरकोळ खर्चाचीच बिले द्या, त्याची सविस्तर टिपण्णी महापालिकेने बूथकडे मागविली. त्यानुसार बूथ हॉस्पिटलने 1 कोटी 98 लाख रुपयांचे बिल महापालिकेने गत आठवड्यात सादर केले आहे. तसेच बूथ हॉस्पिटलच्या विकासाकरीता दोन कोटी स्वतंत्र द्यावेत असाही प्रस्ताव बूथ हॉस्पिटलने महापालिकेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोनाचा संसर्ग कमी झाल्याने महापालिकेची कोवीड सेंटर बंद केली आहेत. मोफत उपचाराला सिव्हीलचा पर्याय उपलब्ध आहे. भविष्यात गरज भासली तर पुन्हा कोवीड सेंटर सुरू केले जातील.

– श्रीकांत मायकलवार, आयुक्त, महापालिका.

- Advertisment -

ताज्या बातम्या