Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश200 कोरोनाबाधितांना रुग्णालयात पोहोचवणार्‍या रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

200 कोरोनाबाधितांना रुग्णालयात पोहोचवणार्‍या रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

नवी दिल्ली –

गेल्या सहा महिन्यांच्या काळात आपल्या रुग्णवाहिकेतून 200 कोरोनाबाधितांना रुग्णालयात पोहोचवणारे

- Advertisement -

आरिफ खान यांचा मृत्यू झाला आहे. या काळात आपल्या कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एखाद्या योद्धाप्रमाणे रुग्णांना मदत करण्यासाठी आपले 24 तास दिले होते. दुर्दैव की आरिफ यांचे अखेरचे दर्शनही कुटुंबीयांना घडले नाही.

आरिफ खान हे दिल्लीतील शहीद भगतसिंग सेवादलात काम करायचे. तसेच, मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवत असे. एखाद्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसतील तर पैशांचीही मदतही करत असे. माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी आरिफ यांची तब्येत खालावली. कोरोना चाचणीत त्यांना बाधा झाल्याचे दिसून आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

आरिफ यांचा 22 वर्षीय मुलगा आदिल याने सांगितले की, आम्ही मागील मार्च महिन्यापासून त्यांना कधीतरीच पाहिले आहे. घरातील सर्वांना त्यांची चिंता होती. परंतु, कोरोनाला घाबरून ते घरी बसले नाहीत. तसेच, त्यांचे मित्र जितेंद्र कुमार यांच्यानुसार, आरिफ एकटेच कमवते होते. त्यांचा पगार केवळ 16 हजार रुपये इतकाच होता. आता त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे. आरिफ कायम लोकांना मदत करत असे. मुस्लिम असूनही त्यांनी हिंदूबांधवांवर अंत्यसंस्कार केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या