Thursday, April 25, 2024
Homeजळगावश्रेयवादाचा ऑक्सिजन घेण्यासाठी चाळीसगावात चढाओढ

श्रेयवादाचा ऑक्सिजन घेण्यासाठी चाळीसगावात चढाओढ

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

करोना च्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत चाळीसगाव शहरासाठी औरंगाबाद, जळगाव व बाहेर राज्यातून ट्रक द्वारे रस्ता वाहतूक ने ऑक्सिजन (प्राणवायूचा) पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

परंतु मागणी जास्त असल्याकारणाने करोना रुग्णांना ऑक्सीजन तुटवडा भासू नये म्हणून शहरा लगत असलेल्या गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने स्वतःहून पुढाकार घेत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याकरिता चाळीसगाव येथील नवीन ट्रामा केअर केंद्राला ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्याचे ठरवले आहे.

प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता ही २१० लिटरपर मिनिट एवढा असून ५० ते ६० रुग्णांकरिता नियमितपणे ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल.

याबाबतची माहिती जशी एका कार्यकर्त्याला पडली. लगेच त्यांनी आमच्या दादांच्या प्रयत्नाने अंबुजा कंपनी ऑक्सिजन निर्मिती युनिटची निर्मिती करण्यात येत असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केली.

ही पोस्ट व्हायरल होत नाही, तोच गल्लीतून दिल्लीत गेलेल्या दादांच्या कर्मचार्‍याने अंबुजा कंपनीने आमच्या दादांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन निर्मिती युनिट दिल्याचे भासविण्यासाठी पोस्ट व्हायरल केली.

आता कोणत्या दादांनी नेमणे ऑक्सिनच्या युनिटसाठी प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय आहे. मात्र सद्या गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव कोरोना उपया-योजना संदर्भात लोकांचा जिव वाचविण्यापेक्षा राजकारणासाठी श्रेयवादाचा ऑक्सीजन कसा घेता येईल, याकडे चाळीसगावातील राजकारण्याचे लक्ष असल्याची चर्चा आहे.

त्यात सद्या दोन लोकप्रतिनिधीमध्ये खास चढाओढ असल्याचे सोशल मिडियावरील पोस्टवरुन दिसत आहे.

दरम्यान यापूर्वीही ट्रामा केअर केंद्राला कंपनी व्यवस्थापनाने स्वता; १० बेड, १० मेटरेस, १० आयसीयु मोनिटर, व ४ ऑक्सिजन स्वनिर्मित मशीन देवून माणुसीकीचा धर्म जपला होता. गुरुवारी दि.२१ रोजी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत गुजरात अंबुजाच्या व्यवस्थापनाने ट्रामा केअर केंद्राची जागा बघून युद्धपातळीवर काम पूर्ण कसे करता येणार यासाठी भेट घेतली आहे. व लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती अंबुजाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. परंतू श्रेयवाद घेणार्‍या कोणत्या दादांंनी काय-काय केले, याबाबतचे ऑडिट येणार्‍या नगर परिषदेत, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मतदार करणारच आहे. त्यामुळे चाळीसगावातील राजकारण्यांनी श्रेयवादाचा ऑक्सिन घेण्यापेक्षा, लोकसभेच्या व इतर निवडकांमध्ये केलेला विकासाचा वादापूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, हिच जनतेची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या