Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाल्या...

अमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली गाडी सापडली होती. त्यानंतर या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लागलेलं दिसत आहे. पुढे सचिन वाझे

- Advertisement -

यांना पोलिस दलातून निलंबीत करण्यात आलं तर एनआयएनं तपास हाती घेतल्यावर सचिन वाझेंना अटक सुद्धा केली आहे. या अटकेनंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहेत. विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘एकीकडे नागपूरमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या काही ‘पिट्ठुंच्या’ साथीने उद्योगपतींच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे, अस म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी हॅशटॅग सचिन वाझे असं देखील ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

याआधीही, ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी अमृता फडणवीस यांनी सोडलेली नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणीत सुरुवातीपासूनच सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेलं दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या