Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमला बळीचा बकरा बनवले - सचिन वाझे

मला बळीचा बकरा बनवले – सचिन वाझे

मुंबई –

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी

- Advertisement -

एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली आहे.

वाझेला 14 मार्चला एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुन्हा एकदा सचिन वाझेला एनआयए कोर्टात हजर करण्यात आले. कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी सचिन वाझेसाठी एनआयएकडून 15 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तर सचिन वाझेने माझा बळीचा बकरा बनवले जात आहे असा दावा कोर्टासमोर करत मला एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती केली आहे.

मला बळीचा बकरा बनवंल जातंय. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करून झालीय, आता आणखीन पोलीस कोठडी देऊ नका, अशी वाझेने एनआयए कोर्टाकडे विनंती केली.

मला कोर्टाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत असेही वाझे म्हणाला. यावर कोर्टाने जे काही सांगायचंय ते लेखी देण्याचे निर्देश दिले आहे.

वाझेकडील 25 काडतुसे गायब ?

दरम्यान सचिन वाझे सेवेत आल्यानंतर त्याला 30 काडतुसे देण्यात आली होती. पण या 30 काडतुसांपैकी 5 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 25 काडतुसे गायब झाल्याचे समोर आले आहे. ही 25 काडतुसे कुठे वापरण्यात आली याबाबतीची माहिती देण्यात आली नाही आहे. अशा गुन्हात पोलिसांचा सहभाग असणे शेरमेची बाब आहे अशी माहिती कोर्टात एनआयएच्या वकीलांनी दिली आहे. देशपातळीवर वाझेंचा गुन्हा मोठा असल्याचेही ते म्हणाले.

वाझेचे वकील काय म्हणाले?

सचिन वाझेच्या वकीलांनी त्याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. युपीए कलम का लावण्यात आला हे एनआयएने सांगावे. स्फोट झाला असल्यास युपीए कलम लावले जाते. जिलेटीन स्टिक डिटोनेटरशिवाय बॉम्ब बनवू शकत नाही. समाजाविरोधात हा कट होता हे एनआयएने सिद्ध करावे, असा युक्तीवाद वाझेच्या वकीलांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या