Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

शुभम पार्क Shubham Park परिसरात मद्यधुंद अवस्थेत चार चाकी वाहनांची व दुकानाची तोडफोड Vandalism करणाऱ्या चार संशयितांची अंबड पोलिसांनी शुभम पार्क परिसरामध्ये धिंड काढली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैभव रणजीत लोखंडे (19,रा. रिगल अष्टविनायक बिल्डिंग, फ्लॅट नंबर 15, अंबड ), वैभव गजानन खिरपडे ( 28,रा. उमराळे बुद्रुक नाशिक, सध्या रा. भाग्यलक्ष्मी रो हाऊस नंबर 3 मेहरधाम पंचवटी ) अविनाश शिवाजी गायकवाड ( 32, शुभम पार्क बिल्डिंग नंबर 7, फ्लॅट नंबर 32, अंबड ), केतन गणेश भावसार ( १९, रा. राजरत्न नगर ) यांचेसह एका अल्पवयीन मुलाने शुभम पार्क परिसरामध्ये कोयत्याच्या सहाय्याने परिसरात धुमाकूळ घालत चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या.

तसेच नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या पाणीपुरीच्या गाडीच्या देखील काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात Ambad Police Station गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

यातील चार संशयितांची परिसरात दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना शुभम पार्क व ज्या परिसरामध्ये त्यांनी गाड्यांची तोडफोड व दुकानाचे नुकसान केले होते त्या परिसरातून फिरवत धिंड काढली. ही मोहीम वपोनी भगीरथ देशमुख ,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाईद शेख, अंमलदार राकेश राऊत,हेमंत आहेर, प्रशांत नागरे,प्रमोद काशीद, जनार्धन ढाकणे, नवनाथ काकड,रुपाली देवरे आदींनी राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या