Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनवापूर : अमरधाम अडकले समस्यांच्या विळख्यात

नवापूर : अमरधाम अडकले समस्यांच्या विळख्यात

नवापूर – Navapur – श.प्र :

शहरातील अमरधाम याठिकाणी मुलभुत सुविधांचा अभावामुळे मरणोपरांत ही मरण यातना नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सोसाव्या लागत आहे.अमरधामकडे जातांना विसाव्याची दुरावस्था झाली असुन आजुबाजुला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

- Advertisement -

नवापूर येथील अमरधाम येथे सुविधांचा वाणवा असुन अमरधामची दुरावस्था झालेली आढळत आहे.यात अमरधाम मधील पाण्याची टाकी एक वर्षापासून फुटलेली आहे.

तर लाकूड ठेवण्यासाठी असलेले शेड वरील पत्र्याची दुरवस्था झाली असुन लाकुड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात, याठीकाणचे नळकनेक्शन तुटलेले असुन शौचालयाची देखील दुरावस्था झालेी दिसते.

वीजेचा खांब तुटलेला असुन अनेक वर्षापासून विद्युत पुरवठा बंद अवस्थेत आहे. अनेक सिमेंटचा भाग तुटलेला आहे.

या ठीकाणी घाण साचलेली आहे.अंत्यविधीसाठी नागरकीक जेथे बसतात तेथे पाऊसाचे पाणी येते. स्लँब गळतो. बांधकामाला तडे गेले आहेत.

पावसाळ्यात लोक उभे राहुन किंवा भिंतीचा अडोशाला उभे राहतात त्याच भिंतीला मोठे तडे गेले आहेत.

अशा अनेक समस्याचा विळख्यात नवापूर येथील अमरधाम सापडलेले आहे. अमरधाम मध्ये अत्यावश्यक सेवा ज्यात पाणी,वीज, शौचालय सारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांची संताप व्यक्त होत आहे.

नवापूर शहराचा सर्व्हे करुन लोकसंख्या व विस्तार वाढल्यामुळे शक्य तेथे अमरधामाची निर्मीती करावी.कारण सध्या एक अमरधाम पुरेसे नाही.

त्यामुळे इतर शहरा प्रमाणे नवापूर शहरात ही अत्याधुनिक अमरधाम करण्यासाठी नगर पालिकेने प्रस्ताव तयार करुन त्यासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या