पूर्ण क्षमतेने होणार प्रवासी वाहतूक

jalgaon-digital
2 Min Read

अमळनेर – Amalner – प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाने एस टी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवाशी वाहातूक करण्याची परवानगी दिली असून आज तशा आशयाचे आदेश एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक राहूल गोरे यांनी राज्यातील सर्व एस टी वाहातूक नियंत्रकांना दिले आहे.

या निर्णयामूळे बसमध्ये प्रवाशी वाहातूकीत सोशल डिस्टन्सचे नियम वगळण्यात आल्याचे स्पष्ट होते लॉक डाऊनच्या काळात दि २२ मार्च पासून बंद असलेली लालपरीला तब्बल ६ महिन्यांनी म्हणजेच दि.२०.०८.२०२० पासून सामाजिक अंतर राखून आसन
क्षमतेच्या ५०% प्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास रा.प. महामंडळास परवानगी दिली होती.

त्यानुसार रा.प. विभागांकडून टप्याटप्याने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून कर्नाटक व गुजरात राज्यात १००% प्रवासी वाहतूकीच्या सुरु केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील रा.प. महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास आज दि १७ पासून मंजूरी देण्यात आली आहे.

सदरची वाहतूक करताना पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.असे निर्देश देण्यात आले आहे त्यात बसेसमधून प्रवास करण्या-या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईजर लावणे बंधनकारक आहे.
वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात.

लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (2) पद्धतीने सद्याआरक्षण उपलब्ध आहे. तथापि, पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्ववतप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत.

सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करुन पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यात यावी. त्यानुसार नियत व फे-यांचे सुसुत्रीकरण करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *