Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिक्षकांचा आँनलाईन नोंदीस नकार

शिक्षकांचा आँनलाईन नोंदीस नकार

अमळनेर – Amalner – प्रतिनिधी :

शासनाने शिक्षकांना कोविड १९ चे काम देऊ नये त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देऊनही राष्ट्रीय कार्य म्हणून शिक्षक दररोज ५० घरांचे सर्वेक्षण करण्यास तयार आहेत .

- Advertisement -

मात्र जादाचे ऑनलाईन नोंदणीचे काम देऊ नये यासह काही मागण्या विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे

शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित देता यावे म्हणून १७ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाने कोविड १९ च्या कामातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश पत्रकान्वये दिले होते त्याची अंमलबजावणी न करता शिक्षकांना कोविड १९ चे सर्वेक्षण देण्यात आले आहे .

दिवसभर ५० घरांचे सर्वेक्षण ऑक्सिजन , तापमान तपासणी सह त्यांच्या आजारांची व कुटुंबाची अशा २२ नोंदी कराव्या लागतात त्यामुळे शिक्षकांना सकाळी ७ पासून ते दुपारी ३ पर्यंत गुंतून रहावे लागते यामुळे त्यांच्या ऑनलाईन अध्यापनावर परिणाम होत असून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियान राबवताना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे.

यात आणखी भार शिक्षकांवरच लादून त्यांना त्या नोंदी ऑनलाईन करण्याचे काम सोपवले जात आहे त्यामुळे शिक्षक शिक्षणाच्या मूळ कामापासून दूर जात आहे पालक,विद्यार्थी व संस्थाचालकांच्या रोषाला बळी पडत आहे कोणतेही पीपीई किट नाही,सुरक्षित मास्क नाहीत अशा अवस्थेत शिक्षक धोक्यात काम करत आहेत.

काही नागरिक दादागिरी करत असल्याने सुरक्षेचा धोकाही निर्माण झाला आहे त्यामुळे शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांनी मुख्याधिकारी विद्या गायकवाड व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाईन चे जादा काम करण्यास नकार देऊन सुरक्षा देण्यात यावी ,५० लाखाचा विमा हमी , विविध मागण्या केल्या आहेत.

निवेदनावर नाशिक विभागीय टी डी एफ कौन्सिल सदस्य पी डी पाटील,तालुका टी डी एफ अध्यक्ष सुशील भदाणे , तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील , शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ , संजय भदाणे , रवींद्र महाजन , नरेंद्र घोरपडे , किशोर पाटील ,प्रफुल्ल भदाणे ,दिनेश पाटील , सरोजकुमार ठाकरे , ईश्वर गव्हाणे , प्रवीण पाटील ,सुशील शिसोदे ,दीपक शिंदे , प्रदीप ठाकूर ,शशिकांत पाटील ,महेंद्र भोई , हेमंत बाविस्कर ,अविनाश पाटील , विश्वास चौधरी ,प्रदीप ठाकूर , एस एल मनुरे , एन जे पाटील ,पी एच पाटील ,के इ सोनवणे ,व्ही डी पाटील ,ए डी सैंदाने , एस बी मोरे शैलेश वैद्य यांच्यासह अनेक शिक्षकांच्या सह्या आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या