Thursday, April 25, 2024
Homeजळगावखाजगी बस सेवेला परवानगी

खाजगी बस सेवेला परवानगी

अमळनेर Amalner – प्रतिनिधी :

राज्यातील खाजगी बससेवा सूरू करण्यास राज्य शासनाने

- Advertisement -

परवानगी दिली असून प्रवाशांसाठीचे ई पास सेवा देखील बंद केली आहे त्यामूळे दि १ सप्टेंबर पासून खाजगी बसेस धावू शकणार आहेत.

राज्यातील खाजगी बस सेवा चालक मालक संघटनेने २ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदेलनाचा इशारा दिला होता तर जळगांव जिल्हयातील बसचालकांनी सामूहिक आत्महत्येची परवानगी राज्य शासनाकडे करून बससेवा सुरू न केल्यास सर्व बसेस जिल्हा परिवहन कार्यालयात लावण्याचा इशारा दिला होता .

राज्यशासनाने यावर तातडीने निर्णय घेतल्याने खाजगी बस वाहातूक संघटनेचे अजय केले ,रविंद्र चौधरी ,अमोल पाटील ,जयंत पाटील, मून्ना सोनार यांनी आभार मानले आहे.

जिल्ह्यात सूमारे ४०० खाजगी प्रवाशी वाहातूक मूंबई पूणे आदी मोठ्या शहरात प्रवाशी वाहतूक करतात त्या ऊद्या पासून रस्त्यावर धावणार आहे गेल्या ६ महिन्यांपासून हि सेवा बंद होती

- Advertisment -

ताज्या बातम्या