Thursday, April 25, 2024
Homeनगरअंमळनेर-निंभारी शिवरस्ता झाला 40 वर्षानंतर खुला

अंमळनेर-निंभारी शिवरस्ता झाला 40 वर्षानंतर खुला

नेवासा (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर-निंभारी हा 40 वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता जिल्हा परिषदेचे

- Advertisement -

पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून वहिवाटीकरिता खुला झाला.

श्री. गडाख यांचे हस्ते नारळ वाढवून रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी गंधे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी सभापती सुनील गडाख म्हणाले की, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात काम सुरु असून मागील काही दिवसांपासून खरवंडी गटात मोठ्या प्रमाणावर काम सुरु झाले आहे. कैलास बाचकर, प्रा. दादासाहेब जाधव, श्रीकांत जाधव, लक्ष्मण धात्रक, रामभाऊ पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास राहुल माकोणे, अंमळनेरचे सरपंच अच्युत घावटे, चंद्रकांत टेमक, मुळाचे संचालक दामोधर टेमक, पोलीस पाटील अनिल माकोणे, भाऊसाहेब भाग्यवंत, सतिश फुलसौंदर, भगिरथ जाधव, लक्ष्मणराव कोरडकर, राधाकृष्ण जाधव, आत्माराम जाधव, आप्पासाहेब जाधव, पांडूरंग जाधव, व्यंकटराव शिरसाठ, खंडेराव शिरसाट, गोरक्षनाथ जाधव, भरत जाधव, भिमराज जाधव, हरिभाऊ वाकडे, गुलाब जाधव, राजू वाकडे सह शेतकरी उपस्थित होते. पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस पाटील अनिल माकोणे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या