अमळनेर शहरात महिलेकडून दोन किलो गांजा व सुमारे ५० लाखांचा ऐवज हस्तगत

अमळनेर (प्रतिनिधी) –

शहरातील फाफोरे रोडवरील कांजर वाड्यात आज पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून केलेल्या छापेमारीत एका महिलेकडे सुमारे दोन किलो गांजा व ४८ लाख ४१ हजार ६८० रुपये रोख मिळून आले आहे. यासह २५ हजार रुपये किंमतीचे १५०० गावठी दारूचे रसायन व तीन हजार रुपये किंमतीची १५० लिटर गाावठी दारु आणि ९०० रुपये किंमतीची तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

.डी.वाय.एस.पी. राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, एपीआय एकनाथ ढोबळे व पोलीस कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक स्वरूपात एका महिलेकडे छापा टाकला असता दोन किलो गांजासह, रोख रक्कम तसेच गावठी दारूदेखील आढळून आली आहे. लॉकडाऊनमध्ये ही सर्वात मोठी कारवाई असून, रोख रक्कम मोजणे व गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू होती. पोलीसांच्या या धाडसी व मोठ्या कार्यवाहीने कौतूक होत असून यातील बडा मासा शोधण्याचे कसब पोलीसांना करावे लागणार असून त्या दृष्टीने तपास सूरू आहे.