Friday, April 26, 2024
Homeनाशिकक. का. वाघ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी मेळावा

क. का. वाघ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी मेळावा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

क. का. वाघ विदया भवन गिताई वाघ कन्या विदयालय, क. का. वाघ माध्यमिक विदयालय या विदयालयाच्या माजी विधार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि. १०) दुपारी ३ वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या मेळाव्यास सहभागी होण्याचे आवाहन क. का. वाघ शिक्षणसंस्था अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

क. का. वाघ विदयाभवन या पब्लिक स्कुलधर्तीवरील मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना १९७० मधे झाली. मुलामुलींसाठी भाऊसाहेबनगर (ता. निफाड) येथे गुरुकुल वस्तीगृह या दरम्यान सुरु केले गेले.

पुढे मुलींसाठी गिताई वाघ कन्या विदयालय आणि क. का. वाघ माध्यमिक विदयालय सुरु झाले. या विदयालयातुन नाशिक, अहमदनगर, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातल्या तीस हजाराहुन अधिक विदयार्थी विदयार्थीनी यांनी माध्यमिक शिक्षण घेतले आहे.

क्रीडा, संगीत, कला क्षेत्रासह प्रशासकीय, वैदयकिय, राजकिय क्षेत्रात येथील विदयार्थी काम करत आहेत. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भाऊसाहेब नगर येथे दहा हजार माजी विद्यार्थ्यांचे उपस्थित मेळावा संपन्न झाला. या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांचे उपस्थित साध्या पध्दतीने सांगता समारोह होत आहे.

विश्वस्त वर्गाचे उपस्थितीमधे सेवानिवृत शिक्षकांचा सन्मान आणि ऑनलाईन हितगुज रविवार (दि. १०) रोजी दु. 3 वाजता होणार आहे.

तरी सर्व माजी विदयार्थी वर्गाने या ऑनलाईन मेळाव्यास ऑनलाईन उपस्थित रहावे. दिलेल्या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन बाळासाहेब वाघ, समीर वाघ, प्राचार्य एस. बी. गाडे, मुख्याध्यापिक मुख्याध्यापिका जयश्री पानगव्हाणे, मुख्याध्यापक सी. पी. कुशारे गुरुकुलचे अधिक्षक एस. एस. ढवळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या