Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा तालुक्यातील 24 गावांमध्ये अलर्ट झोन

अक्कलकुवा तालुक्यातील 24 गावांमध्ये अलर्ट झोन

तळोदा – Taloda – ता.प्र :

अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर परिसरात मृत आढळलेल्या दोन कावळ्यांचे नमुने रोग अन्वेषण विभाग औंध पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

- Advertisement -

त्यांचे रोग निदान प्रलंबित असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील 24 गावे अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यात रायसिंगपुर, रांझणी, उखळ साग, घुनंशी, अंबाबारी, डीगीअंबा, नवानागरमुथा, जुना नागरमुथा, भोयरा, खापर, खटवणी, ब्राह्मणगाव, ब्रिटिश अंकुश विहीर, गलोठा, सोनापाटी, जांभीपाणी, लालपुर, काकडखुंट, शेल्टापाणी, रोजकुंड, रतनबारा, दसरापादर, भराडीपादर, करणपाडा या गावांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या