Thursday, April 25, 2024
Homeनगरमद्यपी वाहन चालकांविरोधात जिल्हा पोलिसांची विशेष मोहिम

मद्यपी वाहन चालकांविरोधात जिल्हा पोलिसांची विशेष मोहिम

अहमदनगर|Ahmedagar

मादक द्रव्याचे सेवन (Drug use) करून वाहन चालविणार्‍याविरोधात कारवाई (Action Against the Driver) करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Nashik Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी जिल्हा पोलिसांना (District Police) दिले आहेत.

- Advertisement -

जिल्हा पोलिसांनी (District Police) रविवारी रात्री जिल्ह्याभरात विशेष मोहिम राबवून मद्यप्राशान (Alcoholism) करून वाहन चालविणार्‍या 47 वाहन चालकाविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात मोटार कायदा 185 अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत कळविले असल्याचे, नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले (Traffic Branch Police Inspector Rajendra Bhosale) यांनी सांगितले.

मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविल्यामुळे रस्ते अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ते अपघात (Road Accident) रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी रविवारी रात्री आठ ते 12 यावेळेत जिल्हाभर वाहन चालकांची तपासी करून मादक द्रव्याचे सेवन करणार्‍या 47 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे सुरू राहणार असून वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नये, असे आव्हान जिल्हा पोलिसांनी (District Police) केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या