Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रबी-हेवी मळीपासून तयार मद्यार्क देशी-विदेशी मद्यनिर्मितीसाठी वापरण्यास परवानगी

बी-हेवी मळीपासून तयार मद्यार्क देशी-विदेशी मद्यनिर्मितीसाठी वापरण्यास परवानगी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

कोव्हिड -19 विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे बी-हेवी मळीपासून निर्मित जलरहित मद्यार्काची (इथेनॉल) उचल होत नसल्याने बी-हेवी मळीपासून आरएस (शुध्द मद्यार्क ) व इएनए(अतिशुध्द मद्यार्क) उत्पादन घेण्यास व सदर मद्यार्क देशी-विदेशी मद्यार्क निर्मितीसाठी वापरण्यास परवानगी मिळणेबाबत अनेक आसवण्यानी राज्य सरकला केली होती.ती मान्य होऊन बी-हेवी मळीपासून तयार मद्यार्क देशी-विदेशी मद्यनिर्मितीसाठी वापरण्याची परवानगी राज्याचे गृहविभागाने दिली आहे.

- Advertisement -

याबाबत गृह विभागाने दि. 20 मे रोजी शासनाच्यावतीने एक पुरकपत्र जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संदर्भ 1, 2 व 3 मधील मार्गदर्शक सूचनांनूसार राज्यात साखर, साखरेचा पाक, उसाचा रस, बी-हेवी / सी-हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीकरुन त्याची साठवणूक व विक्रीबाबत धोरण संदर्भ क्र.4 नुसार निश्चित करण्यात आले आहे.

आता कोव्हिड -19 विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे बी-हेवी मळीपासून निर्मित जलरहित मद्यार्काची (इथेनॉल) उचल होत नसल्याने बी-हेवी मळीपासून आरएस (शुध्द मद्यार्क) व इएनए (अतिशुध्द मद्यार्क) उत्पादन घेण्यास परवानगी मिळणेबाबत अनेक आसवनी घटकांनी विनंती केली आहे. संदर्भ क्र.4 मधील अटी व शर्ती पाहता आसवनी घटकांना बी-हेवी मळीपासून इथेनॉल व्यतिरिक्त आर.एस. (शुध्द मद्यार्क ) व इ.एन.ए. (अतिशुध्द मद्यार्क) उत्पादन व विक्री करिता कोणताही अडसर नाही. त्यामुळे उत्पादनाचे (इथेनॉल व्यतिरिक्त) स्वातंत्र्य संबंधीत घटकास आहे.

मात्र असे करताना संबंधित घटकाने, केंद्र शासनाच्या धोरणानुसार तेल विपणन कंपन्यांशी इथेनॉल पुरवठ्याबाबत काही करार केले असल्यास व त्याची पुर्तता न झाल्यास अशा दायित्वाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित घटकांची राहील व याबाबत राज्य शासनाचे कोणतेही दायित्व राहणार नाही असे ही शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या