एका चुकीमुळे अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार; अमेरिकेने ‘असे’ राबवले ऑपरेशन

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काबूलमध्ये (Kabul) ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) खात्मा करण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी व्हाईट हाऊसमधून केली आहे…

अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या विमान हल्ल्याशी (Airplane Attack) अल जवाहिरीचा संबंध होता. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या (Osama bin laden) खात्मानंतर जवाहिरीचा खात्मा झाल्याने हे मोठे यश मानले जात आहे.

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

जवाहिरीला वारंवार घराच्या बाल्कनीत जाण्याची सवय होती, आणि हीच सवय त्याला महागात पडली. बाल्कनीत येण्याच्या सवयीमुळे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या (CIA) अधिकाऱ्यांना जवाहिरीच्या काबूलमध्ये असण्याची कल्पना आली आणि त्यांनी रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाईल डागून जवाहिरीचा खात्मा केला.

राज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

या ऑपरेशनचे खास बैशिष्ट्य म्हणजे या हल्ल्यात अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एकही अमेरिकन सैनिक उपस्थित नव्हता. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानुसार, अमेरिकेने अचूक ड्रोन हल्ला केला आणि अल-जवाहिरीला ठार केले. काबूलमधील अमेरिकेच्या या कारवाईचा तालिबानने निषेध केला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *