Saturday, April 27, 2024
Homeनगरहैदराबादी वकील अकुला आणि पंटर तनपुरेला मंगळवारपर्यंत कोठडी

हैदराबादी वकील अकुला आणि पंटर तनपुरेला मंगळवारपर्यंत कोठडी

पारनेर |प्रतिनिधी| parner

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील तांत्रीक पुराव्यावरून गुन्ह्यातील फरार आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास मदत करणारा

- Advertisement -

हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यवसायीक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेरच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार बोठे हा फरार झाल्यापासून एका गुन्हेगाराच्या मोबाईल नंबरवरून महेश तनपुरे याच्या संपर्कात होता. याच फोनवर बोठे कुटुंबाशी संभाषण करत होता.

हैद्राबादमध्ये बोठे याने वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा याच्या आश्रयाने लपून बसला होता. त्यास दडून बसण्यासाठी राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ हे मदत करीत होते. तर महेश तनपुरे हा मोबाईवरील संपर्कावरून बोठे यास माहीती देत होता. बोठेच्या पत्नीचे बोलणे करून देत होता. यापैकी जनार्दन अकुला चंद्राप्पा व महेश तनपुरे यांना शनिवारी पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

तर उर्वरीत आरोपींना शुक्रवारी पारनेरच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. तर पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी फरार आहे. अकुला चंद्रप्पा तसेच तनपुरे यांना न्यायालयापुढे उभे केले असता नगरचे वकील राहुल पवार यांनी जनार्दन आकुला यांची तर पारनेरचे वकील संकेत ठाणगे यांनी तनपुरे यांची बाजू मांडली.

दोन्ही आरोपींचा गुन्ह्याशी सबंध नाही. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यासाठी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. पोलिसांच्या वतीने उपअधीक्षक अजित पाटील यांनी स्वतः बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघा आरोपींना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या